Homeचिट चॅटबँक ऑफ बडोदाची विलेपार्ले फिजिटल...

बँक ऑफ बडोदाची विलेपार्ले फिजिटल शाखा सुरू

बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू  झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे.

बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक  ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे 

उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य  आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते.

बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक  विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटरदेखील आहेत जेथे अखंड ग्राहकसेवा मिळते. देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे.  फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content