Homeन्यूज ॲट अ ग्लांसउपराष्ट्रपती धनखड आजपासून...

उपराष्ट्रपती धनखड आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज आणि उद्या, अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत. मुंबईत आज उपराष्ट्रपती राजभवनलादेखील भेट देणार आहेत.

उद्या ते मुंबईत एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान मंदिराच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर ते नागपूरला प्रयाण करतील. नागपूरमध्ये ते रामदेवबाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरचे उद्घाटन करतील.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content