Homeपब्लिक फिगरवाझे प्रकरण लोकल...

वाझे प्रकरण लोकल तर परमबीरचे नॅशनल?

शिवसेनेशी संबंधित सचिन वाझेंचे प्रकरण लोकल लेव्हलचे असल्यामुळे त्यावर मी भाष्य करणार नाही असे वक्तव्य करणाऱ्या शरद पवार यांना परमवीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचविण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय स्तरावर पत्रकार परिषदांचा सपाटा सुरू केल्याने त्यांना आता हे प्रकरण बहुतेक राष्ट्रीय पातळीचे वाटले असावे, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज लगावला.

मुंबईचे माजी पोलीस माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सातत्याने पाठराखण करणारे शरद पवार यांनी आता तरी महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी व तत्काळ अनिल देशमुख यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आरोप केल्यानंतर हे सर्व आरोप कसे चुकीचे आहेत, ते पत्रच खोटे आहे, पत्रावर शंका व्यक्त होत आहे व त्या पत्रातील नोंदीनुसार सचिन वाझे व गृहमंत्री देशमुख यांची भेटच झाली नसल्याचे तारखांचे दाखले पवार साहेबांनी तातडीने दिले. जर परमबीर सिंह यांनी ते पत्रच लिहिले नसते तर त्यांनी पोलीस सेवेत असतानाही गृहमंत्र्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल का केली असती याचे उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

पुरावे नष्ट करण्याआधीच गृहमंत्री देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशीची मागणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली असेल तर न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकासुद्धा खोटी आहे का, असा सवालही चंद्रकात पाटील यांनी केला.

दोन दिवस होऊनही महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे काढणाऱ्या या गंभीर पत्राच्या चौकशीचे साधे आदेश अद्यापही महाविकास आघाडी सरकारने दिलेले नाहीत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमध्ये खुद्द शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख आहे. ज्याअर्थी पवार यांनी याबाबत कुठेही इन्कार केला नाही, त्याअर्थी या पत्रामध्ये तथ्य असल्याचे सिध्द होत आहे, मग सत्तेच्या लालसेपोटी पवार या प्रकरणात नक्की कोणाच्या कृष्णकृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत असा सवालही तयांनी केला.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content