Homeकल्चर +५ लाखांच्या बक्षिसांचा...

५ लाखांच्या बक्षिसांचा वर्षाव.. ‘वयम्’ची आभासी गणेशोत्सव स्पर्धा!

महाराष्ट्राचा आवडता सण, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अनेक मंडळे आणि सोसायट्या कोरोनाचे निर्बंध कायम असल्यामुळे उत्सवाच्या आयोजनाबद्दल चिंतित आहेत. मात्र, व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोद्वारे निर्मित ‘वयम्’, या मेक इन इंडिया अॅपने गणेश मंडळांची ही चिंता दूर केली आहे.

‘वयम्’ने आभासी गणेश चतुर्थी उत्सव आयोजित केला असून या माध्यमातून गणेशभक्तांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पूजा अनुभव सुनिश्चित करण्यात आला आहे. याद्वारे गणेशोत्सव मंडळे, गुरुजी (पंडित, पुजारी) तसेच निवासी सोसायटी आदींना आपल्या उत्सवाचे आयोजन वास्तविक जीवनातील अनुभवाप्रमाणे साजरे करता येणार आहे. आरती असो वा ढोल-ताशा अथवा सोसायट्यांद्वारे आयोजित विविध स्पर्धा, या सर्वांसाठी हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.

‘वयम्’द्वारे सर्वात सुशोभित मंडप, ऑनलाईन सहभागी असलेला सर्वात लोकप्रिय उत्सव आणि प्लॅटफॉर्मच्या सर्वोच्च वापरावर आधारित सर्वात आकर्षक व्हर्च्युअल मंडप अशा तीन श्रेणीत घेतली जाणारी गणेशोत्सव स्पर्धादेखील यादरम्यान आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना ५,००,००० रुपयांचे बक्षीस प्रदान केले जाईल.

‘वयम्’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव त्रिपाठीम्हणाले की, आम्ही सर्वांना शांततापूर्ण आणि समृद्ध गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो. भगवान गणेश आपल्याला समृद्धी, प्रेम आणि आनंदाने आशीर्वाद देतील. वयम् वापरकर्त्यांना सुरक्षा सुनिश्चित करताना एक प्रकारचा आभासी उत्सवाचा अनुभव प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या गणेश चतुर्थीला आमचे वापरकर्ते कोणत्याही अडथळ्याविना सहभागी होऊ शकतील.

आभासी गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी विविध सोसायटी आणि गणेश मंडळे यांना +९१ ८३८३९६२८१४ व्हॉट्सअॅपवर नंबरवर मेसेजद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅप बॉट वापरकर्त्यांना होस्ट करण्यासाठी आपोआप एक इव्हेंट पेज तयार करेल.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content