Homeएनसर्कलयुती धुडकावत ‘वंचित’चा...

युती धुडकावत ‘वंचित’चा ठाकरेंच्या बंडखोराला पाठिंबा!

शिवसेनेच्या ठाकरे गटाशी युती जाहीर करत महाविकास आघाडीचे दरवाजे ठोठावणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आज चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचेच बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा जाहीर केल्याने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याची चर्चा आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती जाहीर केली होती. पुण्यातल्या कसबा तसेच चिंचवड या पोटनिवडणुका ठाकरे गटाने लढवाव्यात असा आग्रह त्यांनी धरला होता. परंतु या निवडणुकांमध्ये स्वतः उमेदवार न देता ठाकरे गटाने कसब्यात काँग्रेसला तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे आपला पवित्रा बदलत चिंचवडमधून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले ठाकरे गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांना वचितने पाठिंबा जाहीर केला आहे. आज तशी रीतसर घोषणा करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. कसबा पोटनिवडणूक काँग्रेस लढत आहे. परंतु काँग्रेसच्या  अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून अजूनही वंचित बहुजन आघाडीकडे कसबा मतदारसंघात पाठिंबा द्यावा, असे विनंतीपत्र आलेले नाही. आणि म्हणून कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही.

पहाटेच्या शपथविधीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता आणि वरिष्ठांनी तसे आधीच ठरवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पहाटेच्या शपथविधीसंदर्भात खुलासा केलेला आहे आणि त्यामध्ये सरकार बनविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष यांचाही आशिर्वाद होता असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने भाजपाबरोबर जाणार नाही, असा कुठेही खुलासा केलेला नाही.

चिंचवडमध्ये 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल कलाटे अपक्ष उमेदवार होते. त्यांना त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता.‌ आणि त्यांनी 1 लाख 12 हजार मते त्यावेळी घेतली होती. राहुल कलाटे महापालिकेत शिवसेनेचे सभागृहाचे नेते होते. म्हणून ही जागा शिवसेनेने लढवावी आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात यावी असा आमचा आग्रह होता. परंतु तसे घडले नाही.

गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती बदललेली आहे. वंचित बहुजन आघाडी पूर्ण विचारांती, भाजपाला चिंचवड मतदारसंघात कोण थांबवू शकले तर राहुल कलाटेच थांबवू शकतात, या मताला आली आहे. वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी एकमताने राहुल कलाटे यांच्या पाठीशी उभे राहील. यादृष्टीने पाठींबा देऊन निवडून आणण्याचे आवाहन चिंचवडमधील मतदारांना वंचित बहुजन आघाडी करत आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

मनसेचा भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कसबा तसेच चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, हा पाठिंबा सक्रीय असणार नाही. मनसेचे कार्यकर्ते भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत, असेही मनसेच्या सूत्रांनी सांगितले.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content