Saturday, July 13, 2024
Homeचिट चॅट१८ फेब्रुवारीपासून अंडर...

१८ फेब्रुवारीपासून अंडर आर्मर चंदिगढ फास्ट!

भारतात धावण्याच्या क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन, हा क्रांतिकारी उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ब्रँडेड ऍथलेटिक परफॉर्मन्स ऍपेरल, फूटवेयर आणि ऍक्सेसरीजचे आघाडीचे इन्व्हेंटर, मार्केटर आणि डिस्ट्रिब्युटर अंडर आर्मर यांनी अतिशय अभिमानाने सुरू केलेला हा उपक्रम फक्त पात्र स्पर्धकांसाठीच असल्याने अनोखा आहे. या स्पर्धेमध्ये पात्र ठरल्यानंतरच भाग घेता येऊ शकेल. अप्रतिम पायाभूत सोयीसुविधा, अनुकूल हवामान आणि सरकारकडून दिले जाणारे प्रोत्साहन यासाठी नावाजले जाणारे शहर चंदिगढमध्ये १८ फेब्रुवारी २०२४ रोजी याची सुरुवात होईल.   

धावण्याची विशेष आवड असणारे अनेक लोक न्यूयॉर्क, शिकागो, बॉस्टन, बर्लिन, टोकियो आणि लंडन या सहा वर्ल्ड मेजर मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी जगभर प्रवास करताना दिसतात. पण या प्रतिष्ठित मॅरेथॉनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इतर प्रमाणित रेसेसमध्ये पात्रता मिळवलेली असणे आवश्यक असते. भारतीयांना ही संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

धावण्याशी संबंधित तंत्रज्ञानाची प्रीमियम कंपनी इंडिया रनिंगचे रेस आयोजक व सीईओ विकास सिंग यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉनमध्ये फक्त कामगिरीवर भर दिला जातो. लांब पल्ल्याच्या धावपटूंना आवश्यक असलेले प्रत्येक साहाय्य देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. उत्कृष्टतेप्रती आमची वचनबद्धता आणि अंडर आर्मरकडून मिळणारा पाठिंबा यांच्यासह आम्ही ही मॅरेथॉन जगातील प्रतिष्ठित वर्ल्ड मेजर मॅरेथॉनसाठी प्रीमियर क्वालिफायर बनवू इच्छितो. फक्त भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया-पॅसिफिक क्षेत्रात येत्या वर्षात हिची ख्याती निर्माण व्हावी हा आमचा उद्देश आहे.

अंडरडॉग ऍथलेटिक्सचे मॅनेजिंग डायरेक्टर (भारतामध्ये अंडर आर्मरचे एक्सक्लुसिव्ह लायसेन्सी आणि वितरक) तुषार गोकुळदास यांनी सांगितले की, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन हे क्षितिजे विस्तारून उत्कृष्टतेचा ध्यास धरून प्रयत्न करण्याचे, अंडर आर्मरला अनुरूप मूल्यांचे प्रतीक आहे. धावपटूंना त्यांची सर्वोत्तम कामगिरी बजावता यावी यासाठी सक्षम बनवणे आमचे उद्दिष्ट असून, अंडर आर्मर चंदिगढ फास्ट मॅरेथॉन ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहे. या रेसचा फक्त भारतातच नव्हे तर जगभरात सखोल प्रभाव घडून येईल, याची आम्हाला खात्री आहे.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!