Homeचिट चॅटयूडीआयडीधारक दिव्यांगांना सीआरसीमध्ये...

यूडीआयडीधारक दिव्यांगांना सीआरसीमध्ये उपचारशुल्क माफ

दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या अखत्यारीतील सर्व राष्ट्रीय संस्था (स्वायत्त संस्था) आणि  संयुक्त प्रादेशिक केंद्रांमधे (CRCs) (स्वायत्त संस्थांचे विस्तारीत विभाग) यूडीआयडी कार्डधारक दिव्यांगांना नोंदणी/निदान/उपचार यासाठी लागणारे शुल्क, एक जानेवारी 2023पासून माफ करण्याचा निर्णय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने घेतला आहे. तसेच, ज्यांच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र आहे आणि त्यांनी यूडीआयडीसाठी नोंदणी केली आहे, अशा सर्वांनाही त्यांचे अपंगत्वाचे प्रमाण कितीही असले तरी या सवलतीचा लाभ मिळू शकेल.

याशिवाय, एनआय/सीआरसीमधील विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी, जे यूडीआयडी कार्डधारक आहेत, तसेच ज्यांच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र आहे आणि ज्यांनी यूडीआयडी पोर्टलवर नावनोंदणी केली आहे त्यांच्यासाठीही, अपंगत्वाची टक्केवारी विचारात न घेता पूर्ण अभ्यासक्रमशुल्क माफ केले जाईल. ही सवलत 2022-23 या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी (दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचे अभ्यासक्रम करत असलेल्या आणि त्यांच्या दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या वर्षी असलेल्या विद्यार्थ्यांसह) लागू असेल.

त्यासह, प्रत्येक राष्ट्रीय संस्था आणि संयुक्त प्रादेशिक केंद्रांना दिव्यांग व्यक्तीला यूडीआयडी अर्ज दाखल करण्यात मदत करण्यासाठी तसेच शनिवार आणि रविवारी सर्व व्यक्तींना उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक समर्पित काउंटर ठेवण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

सर्व प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींचे जीवनमान सुकर व्हावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने, दिव्यांग सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, या क्षेत्रातील व्यावसायिकांचे शिक्षण/पुनर्वसन कौशल्य सुधारण्यासाठी हा विभाग सातत्याने प्रयत्न करत असून या दिशेने, अनेक पावले आणि निर्णय घेण्यात आले आहेत. अशा उपक्रमांमुळे इतर सरकारी संस्थांना दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या फायद्यांसह यूडीआयडी कार्ड लिंक करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री विरेन्द्र कुमार यांनी म्हटले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content