Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत...

उद्धवजी.. तुमचे वहिनींसोबत कौटुंबिक नाते आहे का?

सांगा उद्धवजी की, तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाहीत? तुमचे तुमच्या वहिनीसोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्ख्या भावाने आरोप केले की नाहीत?, असे सवाल मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केले.

उद्धव ठाकरे यांनी काल दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली. त्यावर पलटवार करताना शेलार म्हणाले की, पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हालाही काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, एकेरीत तर अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील. मग तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा शेलार यांनी दिला. आम्ही “मेरी माटी मेरा देशवाले” आहोत. तुमच्यासारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी”वाले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव

ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आलीय, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले. आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले. मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही.. मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. हे कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी दाखवले, अशी टीकाही शेलार यांनी केली.

“मी करणार म्हणजे करणारच…” आरक्षण देणार म्हणजे देणारच…! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…! अशा गेल्या 10 वर्षांत 1 हजार 531 घोषणा तुम्ही केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये ही आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उद्धव ठाकरे म्हणजे “पोकळ शब्दांचे खोडकळ नेते” आहेत, अशा शब्दांतही त्यांनी टीका केली.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content