Homeचिट चॅटमातृदिनानिमित्त ट्रेलचा 'आई'ला...

मातृदिनानिमित्त ट्रेलचा ‘आई’ला सलाम!

प्रत्येक आई एकाचवेळी मार्गदर्शक, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, मैत्रीण अशा विविध भूमिका पार पाडत असते. याशिवायही प्रत्येक आईमध्ये एक वेगळी प्रतिभाही दडलेली असते. याच प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या आणि प्रत्येक आईच्या कार्याला सलाम करण्याच्या उद्देशाने ‘ट्रेल’ या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने मातृदिनाच्या निमित्ताने ‘मॉम्सगॉटटॅलेंट’ या आठवडाभर चालणाऱ्या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे.

याअंतर्गत ट्रेलच्या यूझर्सना त्यांच्या आईची प्रतिभा किंवा वैशिष्ट्ये सादर करणारा व्हिडिओ ट्रेलवर अपलोड करावयाचा आहे. यापैकी एका विजेत्याला पुढील बिग ट्रेलर होण्याची संधी मिळेल आणि शीर्ष ३ विजेत्यांना ट्रेल शॉप गिफ्ट हँपर मिळेल.

ट्रेल

यासोबतच ट्रेलवरील मॉम्मी क्रिएटर शिफा मर्चंट महामारीदरम्यान तिचा आई होण्याचा आणि यातून काय धडे मिळाले, याचा अनुभव शेअर करेल. श्रीमा राय आणि सिमोन खम्बाट्‌टा त्यांचा इन्फ्लूएंसर प्रवास वर्णन करेल. तमिळ क्रिएटर श्वेता राव आणि मोनिका प्रेमकुमार या दोघी मम्मी आणि मुलीचे कपडे कसे मॅचिंग करता येतील तसेच मॉम व बेबी वर्कआउट कसे साधता येईल याविषयी सांगतील.

मातृदिनी ट्रेलचे निर्माते त्यांचा कंटेंट आईला समर्पित करतील. क्लिन्स वर्गीस या हॅपीनेस कोच भारतीय मातांकडून आपण काय शिकले पाहिजे यावर बोलतील. गीतिका चक्रवर्ती या त्यांच्या आईचा जुना लूक शेअर करतील. गिया कश्यप आपल्या आईकडून शिकलेले स्किनकेअर रुटिन शेअर करेल. नित्या नरेश तिच्या आईच्या आवडीच्या गाण्यांवर ठेका धरेल. आपली निर्मिती शेअर करत हे निर्माते यूझर्सनाही गुंतवून ठेवतील. तसेच मातृदिन कसा साजरा करता येईल याच्या नव्या कल्पनाही सुचवतील.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content