Homeएनसर्कलनवी दिल्लीत बुधवारपासून...

नवी दिल्लीत बुधवारपासून ट्रॅव्हल मार्टचे आयोजन!

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे येत्या 4 ते 6 ऑक्टोबर 2023 दरम्यान भारत, पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन PATA ट्रॅव्हल मार्ट 2023च्या 46व्या भागाचे नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरील भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर (IECC) येथे आयोजन करण्यात येणार आहे.

जगभरातील पर्यटन व्यावसायिक आणि संबंधित व्यावसायिक भागधारकांना एकत्र आणून हा ट्रॅव्हल मार्ट 4 ते 6 ऑक्टोबर 2023दरम्यान भरवण्यात येणार आहे. ट्रॅव्हल मार्टची करोनाच्या तीन वर्षांनंतर अशा प्रकारच्या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.

पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) ची स्थापना 1951 मध्ये झाली, या संस्थेचे मुख्यालय बँकॉक येथे असून ही एक नफा ना तोटा तत्त्वावर चालणारी संघटना आहे, जी आशिया पॅसिफिक प्रांतातील प्रवास आणि पर्यटनाच्या जबाबदार विकासामध्ये एक जबाबदार संस्था म्हणून तिच्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे. पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) ट्रॅव्हल मार्ट हे पर्यटन क्षेत्रासंबंधित एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन आहे आणि ते मुख्यतः आशिया पॅसिफिक प्रांतातील जागतिक खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातील व्यापार संवादाचे व्यासपीठ म्हणून काम करते. हे मार्ट विविध क्षेत्रांतील प्रदर्शक आणि संबंधित इच्छुकांना एकत्र आणेल आणि नेटवर्किंग, शिक्षण आणि सहकार्यासाठी एक वेगळे व्यासपीठ प्रदान करेल.

या वर्षी या प्रदर्शनामध्ये, व्यवसाय संबंधित बिझनेस टू बिझनेस (B2B) मार्ट व्यतिरिक्त प्रतिष्ठित पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA)च्या गोल्ड अवॉर्ड सह युवा परिसंवाद, फोरम ऑन सस्टेनेबिलिटी (शाश्वतता या विषयावरील परिसंवाद) यासह विविध उपक्रम सादर केले जातील. हा कार्यक्रम इंटरनॅशनल नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावरील एक्झिबिशन-कम-कन्व्हेन्शन सेंटर (IECC), येथे आयोजित केला जात असून त्याचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये झाले. हे भारतातील सर्वात नवे आणि प्रतिष्ठित प्रदर्शन स्थळांपैकी एक आहे.

जी-20 लीडर्स समिट, अर्थात जी-20 परिषदांचे ठिकाण म्हणूनही जगभरातील जागतिक नेत्यांचे या स्थळाने स्वागत केले होते. या वर्षी झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या यशाने भारताला मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आणि परिषदा आयोजित करण्यासाठी योग्य स्थळ एक म्हणून आधीच स्थान दिले आहे. शाश्वत आणि सर्वसमावेशक पर्यटन उपक्रमांसह भारत मीटिंग्स इन सेम टू युज कॉन्फरन्सेस अँड एक्जीबिशन्स (MICE) यासारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पसंतीचे ठिकाण बनत आहे.

जी-20 नवी दिल्ली लीडर्स डिक्लरेशन (NDLD) ने शाश्वत विकास उद्दिष्ट SDGs साध्य करण्यासाठी नव्या वचनबद्धतेने पर्यटन आणि संस्कृतीची शाश्वत सामाजिक-आर्थिक विकास आणि आर्थिक समृद्धीचे साधन म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली असून पर्यटन वृद्धीसाठी गोवा पर्यटन आराखड्याचा उपयोग शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केला जावा असे नमूद केले आहे. अलीकडेच, 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने, मिशन लाईफ LiFE अंतर्गत, पर्यटन क्षेत्राला लक्ष्य करून, पर्यटकांना प्रवास करताना जबाबदार वागणूक मिळावी या उद्देशाने, प्रवासासाठी लाईफ LiFE हा शाश्वत उपक्रम जागतिक स्तरावर सुरू केला.

पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) ट्रॅव्हल मार्ट मध्येही भारतही मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहे.या मार्टमध्ये भारतासाठी नियुक्त केलेले पॅव्हेलियन भारतातील ज्ञात आणि अज्ञात अशा दोन्ही ठिकाणांच्या वैविध्याचा अनुभव देईल. राजस्थान, गुजरात, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश यासारखी इतर राज्य सरकारे आणि हातमाग विकास आयुक्तालयासारखी इतर मंत्रालये देखील त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी स्टँड आणि स्टॉल लावत आहेत. जरी मार्ट हा केवळ बिझनेस टू बिझनेस (B2B) मार्ट असला तरी,  विविध राज्यांतील आरोग्य, साहस, वारसा, पाककला आणि कला आणि हस्तकला यासारख्या विविध विषयासंबंधी उत्पादने जागतिक प्रेक्षकांसमोर आणण्यास मदत करेल.

Continue reading

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ३ हेक्टरपर्यंत आर्थिक मदत

यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्यशासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी शासनाने मान्यता दिली होती. आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून ६४८ कोटी १५ लाख ४१...

खारपाड जमीनीवरचा खजूर लागवडीचा प्रयोग कोकणातही उपयोगी?

गुजरातच्या सौराष्ट्रमधील अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील एका शेतकऱ्याने खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. हा अनोखा पॅटर्न कोकणातील अन् राज्यातील क्षारयुक्त, खारट शेतजमीनधारकांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. सावरकुंडला येथील या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे- घनश्यामभाई चोडवडिया. त्यांच्या...

‘कोटक सिक्युरिटीज’ने सुचविले काही धमाकेदार दिवाळी शेअर्स!

"कोटक सिक्युरिटीज"ने वर्षभरात 34%पर्यंत रिटर्न्स देतील असे खात्रीशीर धमाकेदार शेअर्स या दिवाळीत गुंतवणुकीसाठी सुचविलेले आहेत. पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करू शकतील असे 7 स्टॉक या ब्रोकरेज हाऊसने शॉर्टलिस्ट केले आहेत. अदानी पोर्ट्स-सध्याची किंमत (CMP): ₹ 1,419पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट: ₹ 1,900गुंतवणुकीवर...
Skip to content