Homeकल्चर +'अशी ही जमवा...

‘अशी ही जमवा जमवी’चा ट्रेलर लॉन्च!

प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

ट्रेलरमध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोघांची कमाल जुगलबंदी पाहायला मिळते. सिनेमातील कथा जरा हटके आहे. त्यामुळे सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर खास ठरतोय. ट्रेलर पाहून अंदाज येतो की मनोरंजनाबरोबरच हा एक कौटुंबिक चित्रपटसुद्धा आहे. नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केला गेलाय. थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी अशी चित्रपटाची कथा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांसोबत सिनेमात ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील.

कथा नक्की काय आहे आणि ती कोणत्या वळणावर जाणार? अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पकडले जातील का? जमवा जमवी कशाप्रकारे होणार आहे हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव, राहुल शांताराम यांनी मनोरंजन विश्वात सिनेप्रेमींसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केली आहे. हा सिनेमा १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात दाखल होईल.

Continue reading

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...

राजकारणात फुलस्टॉप नसतो! मोदींच्या वक्तव्याने खासदार सुखावले!!

राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सभागृहात अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायी भाषण केले. त्यातील "राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो!" हे त्यांचे वाक्य तत्काळ चर्चेचा विषय बनले. निवृत्त होणाऱ्या खासदारांना उद्देशून बोलताना मोदी यांनी सार्वजनिक जीवनातील...

युद्धाच्या धामधुमीत भारतीय निर्यातदारांना दिलासा!

अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून भारतीय कापूस धाग्याची मागणी वाढत असून, जागतिक बाजारपेठेतील ट्रेंडनुसार किमतीही मजबूत होत आहेत. पेट्रोकेमिकल-आधारित पॉलिस्टर धाग्याच्या किमती इंधनटंचाईमुळे आकाशाला भिडत असल्याने,...
Skip to content