Thursday, October 10, 2024
Homeडेली पल्स54व्या इफ्फीत आज...

54व्या इफ्फीत आज “अबाउट ड्राय ग्रासेस”!

गोवा येथे आयोजित 54व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मध्यावधी टप्पा आज पूर्ण होत आहे, त्यानिमित्त मिडफेस्ट चित्रपट म्हणून नुरी बिल्ज सेलन यांनी दिग्दर्शित केलेला “अबाउट ड्राय ग्रासेस” हा उत्कृष्ट तुर्की चित्रपट सादर करण्यात येत आहे. रोचक कथाविषय आणि कलाकारांचे विलक्षण सादरीकरण यासाठी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव प्राप्त केला आहे. कान चित्रपट महोत्सव 2023मध्ये या चित्रपटातील अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सव 2023, टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, कार्लोव्ही वॅरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023, बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 तसेच साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 यासह  जगभरातील इतर अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये याआधीच आपला ठसा उमटवला आहे. या चित्रपटाची आकर्षक कथावस्तू जागतिक पातळीवरील प्रेक्षकांना भावली असून त्यामुळे चित्रपटीय क्षितिजावर हा चित्रपट ठळकपणे उठून दिसणारा झाला आहे.

“अबाउट ड्राय ग्रासेस” हा चित्रपट पणजी येथील आयनॉक्सच्या पडदा क्र.1वर उद्या आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता प्रदर्शित करण्यात येईल. या सादरीकरणादरम्यान चित्रपटाचे कलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

चित्रपटाच्या कथावस्तूची एक झलक

अनिवार्य कर्तव्य पार पाडल्यानंतर, एका छोट्याशा गावाच्या हद्दीतून सुटका करून घेण्याच्या एका तरुण शिक्षिकेच्या आकांक्षेभोवती या चित्रपटाची कथा फिरते. उदासवाण्या जीवनामुळे आलेल्या निराशेला तोंड देत असलेल्या मुख्य पात्राच्या दृष्टीकोनाला नुरे या सहकाऱ्याने दिलेल्या पाठींब्याने चित्रपटाला अनपेक्षित वळण मिळते.

दिग्दर्शक नुरी बिल्ज सेलन

इस्तंबूलमध्ये 1959मध्ये जन्मलेल्या नुरी बिल्ज सेलन यांनी स्वतःला चित्रपट निर्मिती क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती म्हणून प्रस्थापित केले आहे. फेस्टीव्हल द कानमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘कोझा’ या लघुपटाने त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू झाला. वर्ष 1998मध्ये भरलेल्या बर्लिन चित्रपट महोत्सवात त्यांच्या ‘कसाबा’ या चित्रपटाला मिळालेला कॅलिगारी पुरस्कार, वर्ष 2003 मध्ये कान येथे भरलेल्या महोत्सवात त्यांच्या ‘युझक’ या चित्रपटाने पटकावलेले ग्रां प्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्यामध्ये समावेश होतो. त्यांच्या ‘विंटर स्लीप’ या चित्रपटाने 2014मध्ये भरलेल्या 67व्या कान चित्रपट महोत्सवात पाल्मा डोर पुरस्कार मिळवला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठीच्या अकादमी पुरस्कारांसाठी तुर्कस्थानतर्फे “अबाउट ड्राय ग्रासेस”सह सेलन यांच्या एकूण सहा चित्रपटांच्या प्रवेशिक सादर करण्यात आल्या आहेत.

अधिक तपशीलासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा:

https://iffigoa.org/best-of-iffi-midfest-film-2023/en

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content