Homeटॉप स्टोरीअसे असतात संवेदनशील...

असे असतात संवेदनशील मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्याकडे जात असताना चुनाभट्टी कुर्ला येथील पुलावर एक एम्ब्युलन्स बंद पडलेली त्यांच्या निदर्शनास आली. हे पाहताच त्यांनी गाड्यांचा ताफा थांबून त्या संबंधित एम्ब्युलंसची चौकशी केली व त्यातील पेशंटला तत्काळ मदत करण्यासाठी ताफ्यामधली एम्ब्युलंस ठाणे शासकीय रुग्णालय येथे त्वरित पाठवून दिली. त्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरांशी फोनवर चर्चा करून रूग्णाला तत्काळ सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले.

कालही जन्मतः दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले होते. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी, वय अवघं ९ वर्षं असलेला गणेश इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याचं शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचे अपंगत्व थांबवू शकले नाही. हात नसल्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांना पायाने त्यांचे संपूर्ण नाव लिहून दाखवले.

काही दिवसांपूर्वी गणेशला अपंगत्व आहे, त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु हा आजार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसत नसल्याने चिवटे यांनी त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घालून दिली. त्यांनी लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये ५ लक्ष रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “मोठं होऊन काय बनायचं आहे?” असा प्रश्न विचारला असता गणेशने “मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि दुश्मनांना गोळ्या घालायच्या आहेत” असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन दिले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content