Homeब्लॅक अँड व्हाईटदेशात होणार 9,900...

देशात होणार 9,900 कोटींचे 11 औद्योगिक मार्गिकाप्रकल्प!

राष्ट्रीय औद्योगिक  मार्गिका कार्यक्रमाचा एक भाग म्हणून केंद्र सरकार देशभरात टप्प्याटप्प्याने 11 औद्योगिक मार्गिका प्रकल्प विकसित करत आहे. या औद्योगिक मार्गिकाविषयीचे तपशील आणि मंजूर प्रकल्पांच्या ठिकाणी होत असलेल्या प्रस्तावित विकासात्मक उपक्रमांविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

औद्योगिक कॉरिडॉरसाठी मंजूर संस्थात्मक आणि आर्थिक रचनेनुसार, भारत सरकार, राष्ट्रीय औद्योगिक मार्गिकाविकास आणि अंमलबजावणी ट्रस्ट (NICDIT) मार्फत, औद्योगिक मार्गिकाअंतर्गत येणाऱ्या प्रदेशात आणि औद्योगिक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या, उच्च पायाभूत सुविधांच्या विकासासाठी इक्विटी/कर्ज म्हणून निधी उपलब्ध करून देते तर संलग्न आणि भारमुक्त जमीन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित राज्यांची आहे.

दिनांक 31.07.2023 पर्यंत वाटप केलेल्या निधीपैकी, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) या औद्योगिक मार्गिकाप्रकल्पांसाठी 9,899.89 कोटी रुपयांचा निधी मंजूर आणि वितरित केला त्यापैकी 9,816.98 कोटी रुपये खर्च झालेले आहेत.

भारत सरकार खालील 11 औद्योगिक मार्गिकाटप्प्याटप्प्याने विकसित करत आहे :-

1.दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका (डीएमआयसी)

2.चेन्नई बेंगळुरू औद्योगिक मार्गिका (सीबीआयसी)

3.अमृतसर कोलकाता औद्योगिक मार्गिका (एकेआयसी)

4.ईस्ट कोस्ट औद्योगिक मार्गिका (इसीआयसी) च्यासह विझाग चेन्नई औद्योगिक मार्गिका (व्हीसीआयसी)

5.बेंगळुरू मुंबई औद्योगिक मार्गिका (बीएमआयसी)

6.सीबीआयसीचा कोईम्बतूर मार्गे कोचीपर्यंतचा विस्तार

7.हैदराबाद नागपूर औद्योगिक मार्गिका (एचएनआयसी)

8.हैदराबाद वारंगल औद्योगिक मार्गिका (एचडब्ल्यूआईसी)

9.हैदराबाद बेंगळुरू औद्योगिक मार्गिका (एचबीआयसी)

10.ओडिशा इकॉनॉमिक कॉरिडॉर (ओइसी)

11.दिल्ली नागपूर औद्योगिक मार्गिका (डीएनआयसी)

मंजूर प्रकल्प/ विभागांची कॉरिडॉर-निहाय स्थिती/प्रस्तावित विकासात्मक उपक्रम:

Sl. No.CorridorName of the ProjectStatus/Proposed activity
1DMIC: Delhi Mumbai Industrial Corridor(i)Vikram Udyogpuri Township in Ujjain, Madhya PradeshImplementation of major trunk infrastructure packages completed. Land allotment to industries started.
(ii)Integrated Industrial Township at Greater Noida, Uttar Pradesh
(iii)Multi Modal Logistic Hub (MMLH) and Multi Modal Transport Hub (MMTH) at Greater Noida (U.P.)Approved by GoI for development under PPP mode. Taken up for development/implementation.
(iv)Dholera Special Investment Region (DSIR) in GujaratImplementation of major trunk infrastructure packages completed. Land allotment to industries started.
(v)Shendra Bidkin Industrial Area (SBIA) in Maharashtra
(vi)Integrated Multi Modal Logistics Hub at Nangal Chaudhary in HaryanaApproved by GoI for development under PPP mode. Taken up for development/ implementation.
2CBIC: Chennai Bengaluru Industrial Corridor(i)Industrial Node at Krishnapatnam in Andhra PradeshSpecial purpose vehicle (SPV) of the project incorporated and appointment of   Contractor for Engineering, Procurement and Construction (EPC) is taken forward by the SPV.
(ii)Industrial Node at Tumakuru in KarnatakaSPV of the project incorporated.  EPC Contractor appointed for development of trunk infrastructure works.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content