Homeमुंबई स्पेशलमुंबई महापालिकेतल्या अंतर्गत...

मुंबई महापालिकेतल्या अंतर्गत भरतीसाठी झाली लेखी परीक्षा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्‍थापनेवरील कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनाम लिपिक) या निम्न संवर्गाच्‍या रिक्‍त जागांसाठी आज ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पडली. दोन हजारांहून जास्त जणांनी ही परीक्षा दिली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्‍थापनेवरील कार्यकारी सहायक या संवर्गातील १ हजार १७८ पदांची परीक्षा आज झाली. महानगरपालिकेत कार्यरत निम्‍न संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून ही पदे भरण्यासाठी आज दुपारी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. वरळी, पवई, कांदिवली, बेलापूर व नेरूळ येथील केंद्रांवर ही परीक्षा घेण्‍यात आली.

एकूण २ हजार १७३ नोंदणीकृत उमेदवारांपैकी २ हजार ०५३ उमेदवार या परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. तर, १२० उमेदवार अनुपस्थित होते. एकूण २ हजार १७३ उमेदवारांमध्ये दिव्यांग १५० उमेदवारांचा समावेश होता. त्यापैकी १४३ उमेदवार उपस्थित होते. तर, ७ उमेदवार अनुपस्थित होते. सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पडल्‍याचे पालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले. 

Continue reading

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...
Skip to content