Homeएनसर्कलयुद्धनौका ब्रह्मपुत्रा एका...

युद्धनौका ब्रह्मपुत्रा एका बाजूला वाकली!

मुंबईच्या नौदल गोदीत दुरूस्ती व देखभालीसाठी उभ्या असलेल्या ब्रह्मपुत्रा युद्धनौकेला लागलेल्या आगीनंतर काल दुपारच्या सुमारास हे जहाज एका बाजूला (पोर्टच्या बाजूला) वाकलेले आढळले. सर्व प्रयत्न केल्यानंतरही जहाज सरळ स्थितीत आणता आलेले नाही. जहाज सध्या त्याच्या धक्क्याजवळ अधिक वाकलेले आणि एका बाजूला टेकून आहे.

रविवारी, 21 जुलैला संध्याकाळी भारतीय नौदल जहाज ब्रह्मपुत्रा, या बहुभूमिका असलेल्या युद्धनौकेला एनडी (एमबीआय) येथे रिफिट करत असताना आग लागली. मुंबई येथील नौदल डॉकयार्ड आणि बंदरातील इतर जहाजांच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जहाजाच्या इतर कर्मचाऱ्यांनी काल, 22 जुलैला सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. यानंतर, आगीच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण तपासणीसह पुढील प्रक्रिया करण्यात आल्या.

या युद्धनौकेवरील सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु एक कनिष्ठ नाविक अद्यापही बेपत्ता असून त्याच्यासाठी शोधकार्य सुरू आहे. या घटनेच्या चौकशीसाठी भारतीय नौदलाला चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content