निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने विभागात तसेच केंद्र सरकारी निवृत्तीधारकांच्या संस्थांमार्फत देशभरात 3.0 ही विशेष मोहीम सुरू केली आहे. 15 सप्टेंबर 2023पासून मोहिमेचा प्राथमिक टप्पा सुरू झाला. मोहिमेदरम्यान साध्य करण्यासाठी लक्ष्य ठरवण्यासाठीचा हा टप्पा होता. मुख्य मोहीम दोन ऑक्टोबर 2023पासून सुरू झाली आणि ती 31 ऑक्टोबर 2023पर्यंत चालेल.

यामध्ये प्रलंबित गोष्टींचा निपटारा, स्वच्छतेची सवय बाणवणे, अंतर्गत व्यवस्थापन पद्धती बळकट करणे, नोंदी व्यवस्थापनात सुधारणा यावर भर राहील.

या विशेष मोहिमेच्या तयारीच्या टप्प्यात विभागाने आणि केंद्र सरकारच्या निवृत्तीधारक संघटनेने देशभरात 50 स्वच्छतास्थळे ठरवली.

आतापर्यंत लक्ष्य निर्धाराच्या बाबतीत उत्तम यश मिळालेले आहे. यावर्षी पाच हजार सार्वजनिक तक्रारींचे निवारण आणि 600 सार्वजनिक तक्रार अपीलांचे निवारण करण्याचे लक्ष्य विभागाने निश्चित केले आहे. 1358 फाईल्स या मोहिमेदरम्यान पुनर्आढाव्यासाठी निश्चित करण्यात आल्या आणि 883 इलेक्ट्रॉनिक फाईल बंद करण्यासाठी निश्चित केल्या गेल्या. या मोहिमेबद्दल जागृती करण्याच्या दृष्टीने विभागाच्या अधिकृत समाज माध्यम हँडलवर आधी व्ट्विटर आणि आता एक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाज माध्यमांवर पन्नासहून अधिक संदेश दिले गेले. ठराविक काळासाठी विभागाने निश्चित केलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने ही मोहीम पूर्ण वेगाने सुरू आहे.