Homeकल्चर +शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये उलगडणार...

शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये उलगडणार ‘जन्मऋण’चे गुपित!

लोकप्रियतेचा उचांक गाठणाऱ्या दामिनी या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे तथा कांचन अधिकारी ह्या एक नवा विलक्षण विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आपल्या सुसंस्कृत मराठमोळ्या कुटुंबात घडलेल्या सत्यघटनेवर त्यांनी ‘जन्मऋण’ या नव्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या शुक्रवारी, २२ मार्चला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मनोरंजनातून प्रबोधन करीत थेट प्रेक्षकांच्या काळजात स्थान मिळविण्यासाठी त्यांनी ‘आभाळमाया’ या पहिल्या लोकप्रिय मालिकेतील जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते मनोज जोशी आणि अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांना अभिनयाकरीता घेतले आहे.

जन्मऋण

आज निव्वळ भारतात ३२ हजारांच्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही झाल्या आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’ तर्फे तुरुंगवासही भोगाव लागतो. समाजात आपल्या आई-वडिलांना प्रेमाने व आदराने आपल्या मुलांनी वागवावे, केवळ याच एका सद्भावनेने या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केलेले आहे.

‘गणेश फिल्म्स’ निर्मित आणि ‘श्री. अधिकारी ब्रदर्स’ प्रस्तुत ‘जन्मऋण’ चित्रपटाच्या लेखिका, निर्माती, दिग्दर्शक आहेत कांचन अधिकारी. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के., अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण आणि पाहुणे कलाकार म्हणून खास भूमिकेत हिंदी मालिका-चित्रपट अभिनेते महेश ठाकूर, निहारिका रायजादा यांनी काम केले आहे. डीओपी सुरेश देशमाने यांच्या कॅमेऱ्यातून जन्मऋणचे सौन्दर्य अधिकच खुलले असून संगीतकार वैशाली सामंत आणि गायक सुदेश भोसले, वैशाली सामंत यांच्या संगीत सुरावटीने ही कथा अधिक रंग भरते.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content