पणजी मुख्य टपाल कार्यालयात ‘रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली’ काउंटरचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वे तिकीट आरक्षण काउंटर सोमवार ते शनिवार सकाळी 08.00 ते संध्याकाळी 16.00 वाजेपर्यंत (टपाल सुट्ट्या वगळता) सामान्य आणि तत्काळ तिकिटांच्या बुकिंगसाठी आणि तिकीट रद्द करण्यासाठी सुरु राहिल. टपाल खात्याने सुरु केलेले हे गोव्यातील पाचवे रेल्वे तिकीट आरक्षण काऊंटर आहे. रेल्वे आरक्षण सेवा टपाल खात्याच्या म्हापसा, काणकोण, कुंकळ्ळी आणि राया कार्यालयातही उपलब्ध आहेत.
