Homeब्लॅक अँड व्हाईटवर्णमुद्राचे 'मोहोळ'- कौशल्य...

वर्णमुद्राचे ‘मोहोळ’- कौशल्य सारे रचनेत आहे!

ज्येष्ठ पत्रकार व संपादक प्रवीण बर्दापूरकर यांच्या कसदार लेखणीतून कागदावर उतरलेले ‘मोहोळ’ हे पुस्तक दोन दिवसांपूर्वीच पोस्टाने मिळाले. प्रवीणजींना आपल्या वृत्तपत्रीय कारकिर्दीत ज्या व्यक्ती भेटल्या आणि ‘भिडल्या’ त्यांचे व्यक्तीचित्रण या पुस्तकात रेखाटलेले आहे. ‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यात आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत, इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं, असे उद्गार प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत अनंत भालेराव यांनी काढल्यामुळे या पुस्तकावर सध्यातरी लिहिणार नाही!

मग तुम्ही विचाराल आज काय? आज केवळ वर्णमुद्राचे कौतुक! पुस्तक वा ग्रंथाच्या संदर्भात लेखकाचे सोडून प्रकाशकाचे कौतुक करण्यात शहाणपण नसून वेडेपणाच दिसतोय, असं तुम्ही म्हणालही! हल्ली काय, कुणीही कुणावर काही काही बोलत असतात.. शेगाव मुक्कामी असलेल्या या प्रकाशन संस्थेने पोस्टाने पुस्तक पाठवण्याचा जणू वस्तुपाठच घेतला आहे असे म्हणा ना! ब्राऊन पेपरच्या वेष्टनात नीट बंदोबस्तात पाठवलेली पुस्तके तुम्ही-आम्ही सर्वांनीच पाहिलेली आहेत. परंतु वर्णमुद्राने छोटेखानी बॉक्समधून हे पुस्तक पाठवलेले आहे. म्हणूनच वर्णमुद्राचे मनोज पाठक यांचं मुद्दामहून कौतुक. अशा देखण्या पोस्टेजने मला आलेलं हे पहिलं पुस्तक व तेही मित्र असलेल्या सहकाऱ्याचं!!

“कोई फुल धूप की पत्तीयों मे हरे रिबन मे बंधा हुआ

वो गजल का लहजा नया नया

न कहा हुआ न सुना हुआ” (बशीर बद्र)

‘मोहोळ’ वाचण्यापूर्वी हे सहजंच हे सुचलं…

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

नव्या महापालिका आयुक्तांचे स्वागत करताना…

मुंबईच्या पहिल्या महिला महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे मुंबईकरांच्या वतीने स्वागत करताना त्यांना मुंबईतल्या गिरगावातल्या 'हौदा'कडे बोट दाखवण्याची इच्छा नव्हती. परंतु त्या मुंबईच्या मेट्रो प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. आजही तो अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे हीच संधी घेतली म्हणाना. मुंबई...

लांब जटा.. टिळा-टोपी-माळा, अशा प्रतिमेला छेद देणारा भोंदू!

कॅप्टन नसलेल्या आणि इयत्ता दहावी नापास असलेल्या अशोक खरात नामक भोंदूबाबाच्या विविध कथांनी राज्यातील वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने सध्या भरून वाहत आहेत! तसे पाहिले तर आपल्या राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला बुवाबाजींनी ग्रासलेले आहे. कुठे आसाराम आहेत तर कुठे बाबा...

सत्यमेव जयते!

अलीकडे आपल्या सार्वजनिक व खासगी बँकामधील गैरप्रकारांची अनेक प्रकरणे बाहेर आली आहेत. भविष्यात आणखीही येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे अशा सर्व प्रकरणाची एक खासियत आहे की, बँकेचे संबंधित अधिकारी वा संबंधित व्यवसायिक एकदा का न्यायालयात गेले की न्यायांचे 'दळण' सुरु...
Skip to content