Homeटॉप स्टोरीकाँग्रेसच्या मनातली राज्यपालांची...

काँग्रेसच्या मनातली राज्यपालांची भेट, जी ठरलीच नव्हती!

राज्य सरकारकडून शिफारस झालेल्या विधान परिषदेच्या १२ भावी आमदारांचे भवितव्य अजूनही टांगणीलाच आहे. या सदस्यांच्या यादीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याच्या चर्चेला ऊत आला. परंतु राज्य सरकारकडून राज्यपालांची आज भेटही मागण्यात आली नाही आणि राजभवनाकडूनही त्यांना बोलावणे गेले नव्हते, असे संध्याकाळी स्पष्ट झाले.

राज्य सरकारने साधारण आठ महिन्यांपूर्वी राज्यपालांकडे १२ जणांची शिफारस विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी केली होती. एकनाथ खडसे, उर्मिला मातोंडकर, सचिन सावंत आदींचा यात समावेश होता. राज्यपालांनी या यादीला अजूनही मान्यता दिलेली नाही. यावर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयातही दाद मागितली. न्यायालयानेही राज्यपालांना आम्ही कोणतेही निर्देश देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर गेल्या आठवड्यातच प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत लवकरच राज्यपालांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

राज्यपाल

अजित पवार यांच्या या माहितीनंतर काही माध्यमांनी रोज या कथित नियोजित भेटीच्या वृत्तांचा पाठपुरावा चालवला. गुरूवारी काँग्रेसच्या गोटातून राज्यपालांची भेट ठरविण्यात आल्याची माहिती पसरविण्यात आली. त्यामुळेच दूरचित्रवाहिन्यांच्या काही माध्यमांतून आजच्या कथित भेटीचे चित्र रंगविण्यात आले. यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्यपालांना भेटायला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फक्त मुख्यमंत्री राजभवनावर जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहातून मुख्यमंत्री निघाल्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येऊ लागले. पण, नंतर ते शिवाजीपार्कच्या दिशेने रवाना झाल्याचे स्पष्ट होताच माध्यमांची एकच धावपळ झाली. राजभवनावर त्यावेळी पुस्तक प्रकाशनाचा समारंभ चालू होता. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावरील एक मनोहर कथा, नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पुस्तकाच्या लेखिका मंगलाताई खाडिलकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल

तितक्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांवर निशाणा साधत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना भेट नाकारल्याचे सांगितले. नंतर उशिरा राज्य सरकारने तशी भेटच मागितली नसल्याचे व राजभवनाकडून मुख्यमंत्र्यांना बोलावण्यातच आले नव्हते, असे स्पष्ट झाले.

मिलिंद नार्वेकर राजभवनावर

या सर्व घडामोडीतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर पोहोचले. तेथे त्यांनी राज्यपालांची भेट घेतली अशी चर्चा आहे. मात्र, या चर्चेचा तपशील समजू शकला नाही

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content