Thursday, April 17, 2025
Homeहेल्थ इज वेल्थसंवेदनशील मुख्यमंत्री आणि...

संवेदनशील मुख्यमंत्री आणि त्यांच्या यंत्रणेमुळे वाचला चहावाल्याचा जीव!

विजयसिंग बिरबलसिंग परमार. महाराष्ट्राच्या अकोल्यातील ६२ वर्षीय चहा विक्रेता.. आपल्या कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ. जीवघेण्या आजाराच्या विळख्यात अडकला. अचानक प्रकृती खालावल्याने त्यांचे जीवन संकटात आले आणि संपूर्ण कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले. हाताशी ना बचत, ना मालमत्ता, ना कुठला आधार, उपचारासाठी आवश्यक असलेली रक्कम जमवण्याचा कोणताच मार्ग त्यांच्या दृष्टीस पडत नव्हता. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकारातून रुग्णावर तातडीने उपचार केले. वेळीच उपचार मिळाल्याने आमच्या वडिलांचे प्राण वाचू शकले, अशी कृतज्ञता मुलाने वडिलांवर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्यक्त केली आहे.

संघर्षाचा प्रवास

गेल्या चाळीस वर्षांपासून हे वृद्ध गृहस्थ अकोला येथे चहाची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. मुलाने तातडीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर १ जानेवारी रोजी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांसंबंधी गंभीर आजार असल्याचे निदान झाले. स्थानिक डॉक्टरांनी त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी नागपूरच्या विशेष रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा सल्ला दिला. नागपूरमध्ये तपासणी केल्यानंतर या उपचारासाठी १० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. काळाचा घाला म्हणावे तसे वडिलांना उपचार मिळावे यासाठी पाठपुरावा करत असताना मुलाचा अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायांना गंभीर दुखापतही झाली. त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अशातच शेती नाही, मालमत्ता नाही आणि उत्पन्नाचे कोणतेही निश्चित साधन नसल्याने वडिलांवरील उपचारासाठी रक्कम उभारणे त्यांच्यासाठी अशक्य होते.

लोकप्रतिनिधींकडे धाव

उपचारासाठी लागणारी रक्कम त्यांच्या आवाक्याबाहेर होती. अखेर, स्थानिक खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

मुख्यमंत्री कार्यालयाची तातडीने मदत

प्रकृती दिवसेंदिवस खालावत आसल्याने रुग्णाला तातडीने मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. दुसरीकडे कुटुंबियांनी धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. त्यांनी रुग्णाची आर्थिक परिस्थिती, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीकरिता प्रयत्न सुरू केले. सातत्याच्या पाठपुराव्यातून शिवाय संवेदनशील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून उपचारासाठी आवश्यक असलेला खर्चाची रक्कम मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जनआरोग्य योजना, टाटा ट्रस्ट आणि सिद्धिविनायक ट्रस्ट यांच्या सहकार्यातून उभी करण्यात आल्याची माहिती कक्ष प्रमुख नाईक यांनी दिली आणि रूग्णावर यशस्वी उपचार झाले.

मुख्यमंत्री

हे ऋण शब्दांत व्यक्त करणे अशक्य!

आम्हाला वडिलांच्या उपचारासाठी इतकी मोठी रक्कम उभी करणे अशक्य होते. आम्ही आमच्या वडिलांना गमावण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांमुळे रक्कम उभी राहिली आणि त्यातूनच आमच्या वडीलांचे प्राण वाचले. ही मदत आमच्याकरिता केवळ आर्थिक नाही, तर मानसिक आधार आणि आमच्या वडिलांना पुनर्जीवन देऊन गेल्याने, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक आणि या संकटसमयी मदतीला धावून आलेल्या सर्वांचे आयुष्यभर ऋणी राहू, अशी भावना मुलाने व्यक्त केली.

Continue reading

‘एप्रिल मे 99’ने होणार मराठी चित्रपट महोत्सवाला सुरूवात

मुंबईच्या प्रभादेवीतल्या महाराष्ट्र कला अकादमीमधील पु. ल. देशपांडे सभागृहात येत्या २१ ते २४ एप्रिलदरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘मराठी चित्रपट महोत्सव – २०२५’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४१ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन २१ एप्रिलला सायंकाळी ६...

इरेडाने जाहीर केला 1,699 कोटींचा निव्वळ नफा!

एनबीएफसी आणि बँकिंग क्षेत्रातील लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करणारी ठरली पहिली कंपनी ठरतानाच भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने (इरेडा) 2024-25च्या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक 1,699 कोटी रुपयांचा करपश्चात म्हणजेच निव्वळ नफा जाहीर केला आहे. कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी त्यांचे...

दादर-माटुंगा केंद्रात रंगला संगीत नाट्यमहोत्सव

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीत-नाट्य महोत्सव मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. संगीत नाटकांना चांगले दिवस यावेत यासाठी संस्था गेली १६ वर्षे हा महोत्सव आयोजित करत आहे. संगीत अमृतवेल हे खल्वायन, रत्नागिरी निर्मित, आणि डॉ. श्रीकृष्ण जोशी लिखित, मनोहर...
Skip to content