लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी उद्या, सोमवारी मतदान होत असून यात २ कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य व मुंबई दक्षिण अशा एकूण 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे.
त्याबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-.
अ.क्र. | मतदार संघाचे नाव | मतदान केंद्रे | क्रिटीकल मतदान केंद्रे | निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या | बॅलेट युनिट (बीयु) | कंट्रोल युनिट(सीयु) | व्हीव्हीपॅट |
1 | 02 धुळे | 1,969 | 14 | 18 | 3,938 | 1,969 | 1,969 |
2 | 20 दिंडोरी | 1,922 | 04 | 10 | 1,922 | 1,922 | 1,922 |
3 | 21 नाशिक | 1,910 | 06 | 31 | 3,820 | 1,910 | 1,910 |
4 | 22 पालघर | 2,270 | 05 | 10 | 2,270 | 2,270 | 2,270 |
पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण २४ हजार ५७९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या तेरा मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ४१,८९७ तर कंट्रोल युनिट (सीयु) २४,५७९ आणि २४,५७९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून चौथ्या टप्प्यात एकूण २६४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मतदान केंद्र परिसरात १०० मिटरच्या आत भ्रमणध्वनी यंत्रणा (मोबाईल) नेण्यास निर्बंध आहेत.
आपले नाव मतदारयादीत शोधा सहजतेने
मतदारयादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आयोगामार्फत वर्षभर सुरु राहत असून पाचव्या टप्प्यातील मतदारसंघातील मतदारयादीत 22 एप्रिल 2024पर्यंत नावनोंदणी केलेल्या सर्व मतदारांची यादी ऑनलाईन उपलब्ध असून यादीत नाव असलेल्यांना मतदान करता येणार आहे. मतदारांना विनासायस मतदान केंद्र, मतदान यादीतील आपले नाव याची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत व्होटर हेल्पलाईन ॲप तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर व्होटर पोर्टल याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मतदारांनी आपल्या मतदार नोंदणी अर्जामध्ये दिलेल्या प्राथमिक माहितीचा तपशील भरल्यावर त्यांना आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर, मतदारयादीत कितव्या क्रमांकावर आहे याची माहिती उपलब्ध होते.
जे मतदार या दोन्ही सुविधांचा लाभ घेवू शकत नाही त्यांच्यासाठी व्होटर हेल्पलाईन 1950 या क्रमांकावरदेखील सुविधा उपलब्ध आहे. मतदानापूर्वी आवर्जून या सुविधांचा लाभ घेवून मतदारांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वीच ही माहिती घेतल्यास त्यांना अधिक सुलभतेने मतदानाचा हक्क बजावता येईल. तसेच ज्या मतदारांनी आपला मोबाईल क्रमांक मतदार नोंदणी अर्जासोबत जोडलेला आहे त्यांना तो नंबर टाकून किंवा मतदार ओळखपत्राचा दहा अंकी क्रमांक टाकूनदेखील आपले नाव शोधता येणार आहे. याशिवाय निवडणूक आयोगामार्फत घरपोच मतदान चिठ्ठी वितरीत करण्यात येत आहे. मात्र ही चिठ्ठी कुठल्याही प्रकारे मतदार ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही.
85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी तेराही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत
प्रतिबंधात्मक कारवाई
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थांतर्गत 15 मे पर्यंत 50,970 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. परवाने रद्द करून 1,136 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. जप्त करण्यात आलेली अवैध शस्रास्रे 1,976 इतकी आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 1,27,837 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये 1 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 74.35 कोटी रोख रक्कम तर 48.36 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 185.55 कोटी रुपये, ड्रग्ज 264.69 कोटी, फ्रिबीज ०.४७ कोटी आणि इतर बाब अंतर्गत १०५.५३ कोटी रुपये अशा एकूण ६७८.९७ कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
४८,४९० तक्रारी निकाली
16 मार्च ते 16 मे 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ६३८५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ६३७८ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील ४९,५४३ तक्रारीपैकी ४८,४९० निकाली काढण्यात आलेल्या आहेत, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सांगितले.
असे आहे चौथ्या टप्प्यातले मतदान
चौथ्या टप्प्यातील नाशिक विभागातील 05 आणि पुणे विभागातील 03 व औेरंगाबाद विभागातील 03 अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात दि. 13.05.2024 रोजी मतदान घेण्यात आलेले असून मतदानाच्या टक्केवारीबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे.
अ.क्र. | मतदार संघाचे नाव | पुरूष मतदार | मतदान केलेले पुरूष मतदार | महिला मतदार | मतदान केलेल्या महिला मतदार | तृतीयपंथी मतदार | मतदान केलेले तृतीयपंथी मतदार | एकूण मतदार टक्केवारी |
1 | 01 नंदुरबार | 9,92,971 | 7,23,097(72.82%) | 9,77,329 | 6,69,528(68.51%) | 27 | 10(37.04%) | 70.68% |
2 | 03 जळगाव | 10,37,350 | 6,28,123(60.55%) | 9,56,611 | 5,37,827(56.22%) | 85 | 18(21.18%) | 58.47% |
3 | 04 रावेर | 9,41,732 | 6,21,983(66.05%) | 8,79,964 | 5,48,950(62.38%) | 54 | 11(20.37%) | 64.28% |
4 | 18 जालना | 10,34,106 | 7,35,880(71.16%) | 9,33,416 | 6,25,335(66.99%) | 52 | 11(21.15%) | 69.18% |
5 | 19 औरंगाबाद | 10,77,809 | 7,09,131(65.79%) | 9,81,773 | 5,89,055(60.00%) | 128 | 41(32.03%) | 63.03% |
6 | 33 मावळ | 13,49,184 | 7,77,742(57.65%) | 12,35,661 | 6,40,651(51.85%) | 173 | 46(26.59%) | 54.87% |
7 | 34 पुणे | 10,57,877 | 5,84,511(55.25%) | 10,03,075 | 5,19,078(51.75%) | 324 | 89(27.47%) | 53.54% |
8 | 36 शिरूर | 13,36,820 | 7,73,969(57.90%) | 12,02,679 | 6,01,591(50.02%) | 203 | 33(16.26%) | 54.16% |
9 | 37 अहमदनगर | 10,32,946 | 7,21,327(69.83%) | 9,48,801 | 5,98,790(63.11%) | 119 | 51(42.86%) | 66.61% |
10 | 38 शिर्डी | 8,64,573 | 5,80,236(67.11%) | 8,12,684 | 4,77,028(58.70%) | 78 | 34(43.58%) | 63.03% |
11 | 39 बीड | 11,34,284 | 8,31,245(73.29%) | 10,08,234 | 6,88,270(68.27%) | 29 | 08(35.51%) | 70.92% |
चौथ्या टप्प्यातील 11 मतदार संघामध्ये एकूण 62.21 टक्के मतदान झाले.