मान्सून सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष संपूर्ण पावसाळ्यात चोवीस तास कार्यरत असेल (दूरध्वनी क्र. 011-23718525 https://morth.nic.in).

देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या परीचालनावर अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या समस्या, उदा., वाहतूक विस्कळीत होणे, खराब दृश्यमानता आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात, पाणी साचणे, रस्त्यावरील अडथळे आणि दरडी कोसळणे, इत्यादी समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

नियंत्रण कक्षाच्या कर्तव्यतत्परतेसाठी समर्पित चमू तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून सार्वजनिक तसेच सरकारी संस्थांकडून आलेले कॉल प्राप्त करणे आणि राष्ट्रीय महामार्गांच्या परीसंचालनाशी संबंधित पावसाळ्याशी संबंधित घटनांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्लॅटफॉर्मवर देखरेख समाविष्ट आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे किंवा नुकसानीशी संबंधित समस्यांचे जलद निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (एमओआरटीएच), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि राष्ट्रीय महामार्ग आणि संरचना विकास कार्यालय (एनएचआयडीसीएल)यांच्या संबंधित प्रादेशिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे नियंत्रण कक्षातील चमूंना बंधनकारक करण्यात आले आहे.