Thursday, December 12, 2024
Homeएनसर्कलकोडेक्सने केली भरड...

कोडेक्सने केली भरड धान्यांच्या बाबतीत भारतीय मानकांची प्रशंसा!

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) स्थापन करण्यात आलेल्या 188 सदस्य देश असलेल्या कोडेक्स एलिमेंटरियस कमिशन (सीएसी) या आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके निश्चिती संस्थेने भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची प्रशंसा केली आहे. इटलीत रोम येथे भरलेल्या 46व्या सत्रामध्ये या संस्थेने या पोषक धान्यांसाठीच्या जागतिक मानकांसाठी सादर केलेला प्रस्ताव देखील स्वीकारला आहे.

भारताने 15 प्रकारच्या भरड धान्यांसाठी दर्जाधारित 8 मानकांसह व्यापक गट प्रमाणके निश्चित केली आहेत आणि त्यांना या आंतरराष्ट्रीय बैठकीदरम्यान जोरदार पाठींबा मिळाला. कोडेक्सकडे सध्या ज्वारी आणि बाजरी यांची मानके आहेत.

भारताने या पोषक धान्यांसाठीच्या विशेषतः नाचणी, सावा, कोदो, चीना आणि कुटकी या धान्यांच्या जागतिक मानकांसाठी डाळींप्रमाणेच गट मानके निश्चित करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. युरोपीय महासंघासह 161 सदस्य देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत रोम येथील एफएओ मुख्यालयात झालेल्या सत्रात हा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे होत असताना मिळालेल्या या संस्मरणीय यशाबद्दल भारतीय शिष्टमंडळाचे अभिनंदन केले आहे. भरड धान्यांना सामान्य माणसाच्या आवडीचा पर्याय करण्यात भारताने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भरड धान्ये आणि त्यांचे लाभ जगासमोर ठळकपणे मांडण्यासाठी भारताचा प्रस्ताव हा महत्त्वाचा टप्पा ठरेल असे मत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी यावेळी मांडले. एफएसएसएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जी कमला वर्धन राव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने, वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे हे लक्षात घेऊनच नव्हे तर या उत्पादनांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचाही विचार करून भरड धान्यासाठी आंतरराष्ट्रीय गट मानके प्रस्तावित केली होती.

यावेळी एफएसएसएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कमला वर्धन राव यांनी कोडेक्सचे चेअरमन स्टीव्ह वेर्न यांना भरड धान्य मानकांवरील पुस्तक भेट दिले.

सीएसीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने, प्रकल्प दस्तऐवज सादर करणे आणि मसुदा मानके विकसित करण्याचे काम आता भारताकडून सुरू केले जाईल. एफएसएसएआय ने भरडधान्यांच्या 15 प्रकारांसाठी तयार केलेली गट मानके, जे 8 गुणवत्तेचे मापदंड निर्दिष्ट करतात ज्यामध्ये, आर्द्रता समाविष्ट करून घेण्याची कमाल मर्यादा, यूरिक ऍसिड सामग्री, बाह्य पदार्थ, इतर खाद्य धान्य, दोष, भुंगेरे धान्य आणि अपरिपक्व आणि सुकलेली धान्ये, या सर्व बाबी भरड धान्याच्या जागतिक मानकांच्या विकासासाठी एक महत्त्वाचा पाया म्हणून कार्य करतील. ज्वारी आणि मोती बाजरीसाठी सध्याच्या कोडेक्स मानकांचे देखील इतर भरड धान्यांची गट मानके बनवताना पुनरावलोकन केले जाईल.

सध्याचे सत्र हे कोडेक्स एलिमेंटेरियस कमिशनच्या 60 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केले आहे, भारत 1964 पासून या कमिशनचा सदस्य आहे. भारताने आतापर्यंत विविध कोडेक्स मानके/ग्रंथ आणि मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित परिषदांमध्ये 12 वेळा इडब्ल्यूजी (EWG)चे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे तर आणि 28 वेळा इडब्ल्यूजी (EWG) चे सह-अध्यक्ष पद स्वीकारलेले आहे. भारताने प्रस्तावित केलेल्या महत्त्वाच्या मानकांमध्ये भेंडी, बीडब्ल्यूजी मिरपूड, औबर्गिन, सुका आणि निर्जलित लसूण, वाळलेल्या किंवा निर्जलित मिरची आणि पेपरिका, ताजे खजूर, आंब्याची चटणी, चिली सॉस, बटाटे आणि किरकोळ नसलेल्या कंटेनरसाठी लेबलिंग संदर्भातील आवश्यक सामग्री यांचा समावेश आहे.

Continue reading

कामगारमहर्षी आंबेकर बुध्दिबळ स्पर्धेत अंशुमनला चकवून ध्रुव गटविजेता

मुंबईच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती १४ वर्षांखालील बुध्दिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित ध्रुव जैनने (३.५ गुण) पांढऱ्या मोहरांनी खेळणाऱ्या अपराजित अंशुमन समळला (३.५)...

हौशी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘पाकीट’ व ‘लिअरने जगावं की मरावं?’

63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत मुंबई- 1 केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या `पाकीट' या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या 'लिअरने जगावं की मरावं?' या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची...

‘मॅट’च्या ३३ वर्षांतल्या पहिल्याच लोक अदालतीत १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत झालेल्या पहिल्याच लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी...
Skip to content