Friday, February 14, 2025
Homeकल्चर +आजपासून मुंबईत रंगणार...

आजपासून मुंबईत रंगणार ६२वी राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेली ६२वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा आजपासून मुंबईत सुरू होत आहे. मुंबईत गिरगावच्या साहित्य संघ मंदिर आणि माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिर, या दोन ठिकाणी आज, २० नोव्हेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत मुंबई जिल्ह्यातून एकूण ६० नाट्यप्रयोग प्राथमिक फेरीत सादर होणार आहेत. त्यापैकी काही प्रयोग साहित्य संघ मंदिर येथे १५ डिसेंबरनंतर होणार आहेत.

नाट्यस्पर्धा

साहित्य संघ मंदिर येथे होणारे प्रयोगः

२० नोव्हेंबर- मामला गडबड है! लेखक: राजेश मयेकर, दिग्दर्शक: अविनाश गायकवाड, अभिनय साधना, मुंबई.

२१ नोव्हेंबर- करार. लेखक व दिग्दर्शक: प्रकाश पवार, आकांक्षा पत्रऊंडेशन, मुंबई.

२२ नोव्हेंबर- मॅकबेथ. मूळ लेखक: विल्यम शेक्सपियर, अनुवाद: परशुराम देशपांडे, दिग्दर्शक: प्रसिद्धी सोनवणे, बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई.

२४ नोव्हेंबर- खटला. लेखक व दिग्दर्शक: तेजस सर्पे, देवांश सामाजिक सेवा संस्था, मुंबई.

२५ नोव्हेंबर- ज्याचा त्याचा प्रश्न. लेखक: अभिराम भडकमकर, दिग्दर्शक: वनमाला वेंदे, ग्रामीण समाज प्रबोधिनी, मुंबई.

२७ नोव्हेंबर- वाळू. लेखक: प्रकाश गावडे, दिग्दर्शक: दिनेश गोरेगावकर, हॅपी ग्रुप, मुंबई.

२९ नोव्हेंबर- गाढवाची लाथ डायरेक्ट सरकारात. लेखक व दिग्दर्शक: अंकुर वाढवे, मनश्री आर्टस, मुंबई.

३० नोव्हेंबर- बोल राधा बोल. लेखक व दिग्दर्शक: अशोक पालवे, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, नवी मुंबई.

१ डिसेंबर- कोणाच्या खांद्यावर.. लेखक: डॉ. वासुदेव विष्णूपुरीकर, दिग्दर्शक: भारती पाटील, मुक्ताई एज्यु‌केशन अॅण्ड वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई.

४ डिसेंबर- शेवंता जित्ती हाय. लेखक: प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक: सुगत उथळे, सचिवालय जिमखाना, मुंबई.

५ डिसेंबर- अपूर्णविराम. लेखक व दिग्दर्शक: विशाल सोनावणे, नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, वाशी.

६ डिसेंबर- धनंजय माने इथे राहतात का? लेखक: रुपाली पवार, दिग्दर्शक: नम्रता काळसेकर, प्रवेश कला क्रीडा मंच, मुंबई.

७ डिसेंबर- अण्णांच्या शेवटच्या इच्छा. लेखक व दिग्दर्शक: विजयकुमार राख, ऋतुरंग थिएटर, मुंबई.

८ डिसेंबर- सायं. फ्लाईंग राणी. लेखक: मोहन बनसोडे, दिग्दर्शक: अजिंक्य तळवडेकर, सहप्रमुख कामगार अधिकारी, बृहन्मुंबई म.न.पा., मुंबई.

९ डिसेंबर- लग्नाचा सातबारा तीनतेरा. लेखक व दिग्दर्शक: अवधूत भिसे, सावली प्रतिष्ठान, मुंबई.

१० डिसेंबर- आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे. लेखक: वीरेंद्र प्रधान, दिग्दर्शक: नेहा शर्मा, शिवशाही कला क्रीडा सेवा केंद्र, मुबई.

११ डिसेंबर- सप्तपदी. लेखक व दिग्दर्शक: अनिकेत खेडेकर, श्री प्रतिष्ठान, मुंबई.

१३ डिसेंबर- गुलमोहर. लेखक व दिग्दर्शक: वैभव जाधव, सुलु नाट्यसंस्था, नवी मुंबई.

१४ डिसेंबर- विजयस्तंभ. लेखक व दिग्दर्शक: कुणाल तांबे, तन्मय सांस्कृतिक कलामंच, कळंबोली.

नाट्यस्पर्धा

यशवंत नाट्य मंदिर येथे होणारे प्रयोगः

२१ नोव्हेंबर- या वळणावर. लेखक: राजेंद्र जोशी, दिग्दर्शक: रामेश्वर साळुंखे, इम्पल्स नाट्य संस्था, मुंबई.

२२ नोव्हेंबर- निळावंती. लेखक: गोपी भोसले, दिग्दर्शक: शैलेश फणसगावकर, गोदरेज अॅण्ड बॉईज श्रमिक संघ, मुंबई.

२३ नोव्हेंबर- चल थोडं ॲडजस्ट करू. लेखक व दिग्दर्शक: संकेत तांडेल, अमर हिंद मंडळ, दादर.

२४ नोव्हेंबर- द आऊटबर्स्ट. लेखक: अन्वय अष्टीवकर, दिग्दर्शक: भरत मोरे, अन्वय अष्टीवकर, महापारेषण कला क्रीडा व मनोरंजन क्लब, मुंबई.

२८ नोव्हेंबर- येस माय डिअर. लेखक: श्रीनिवास नार्वेकर, दिग्दर्शक: मिलिंद सावंत, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबई.

२९ नोव्हेंबर- घायाळ. लेखक व दिग्दर्शक: शैलेश चव्हाण, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड.

३० नोव्हेंबर- दिवान-ए-मख्फी. लेखक व दिग्दर्शक: डॉ. सोमनाथ सोनवलकर, माणूस फाऊंडेशन, मुंबई.

४ डिसेंबर- देव चोरला माझा. लेखक: सुमित टॉर, दिग्दर्शक: उदय पाटकर, माझगाव डॉक स्पोर्टस क्लब, मुंबई.

५ डिसेंबर- द इनोव्हेटिव्ह, लेखक व दिग्दर्शक: प्रतिमा कांबळे, मृत्युंजय मित्र मंडळ, मुंबई.

११ डिसेंबर- चोर.. चोर.. चोर. लेखक: दिलीप जगताप, दिग्दर्शक: राजीव वेंगुर्लेकर, मुलुंड शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई.

१२ डिसेंबर- अंगणातली रांगोळी. लेखक: अरविंद घोंगडे, दिग्दर्शक: प्रणय आहेर, नवदुर्गा मित्र मंडळ, चेंबूर.

१३ डिसेंबर- एकेक पान गळावया. लेखक: समीर मोने, दिग्दर्शक: सुनील कदम, पोलीस कल्याण केंद्र, मुंबई.

१४ डिसेंबर- मन मनास उमगत नाही. लेखक व दिग्दर्शक: समीर पेणकर, प्रबुद्ध फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई.

१५ डिसेंबर- चांदतारा. लेखक: महेंद्र कुरघोडे, दिग्दर्शक: रमाकांत जाधव, श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई.

१८ डिसेंबर- सारी रात्र. लेखक: पु. ल. देशपांडे, दिग्दर्शक: कविता विभावरी, सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई.

२१ डिसेंबर- गुपित. लेखक: प्रभाकर भोसले, दिग्दर्शक: अभिषेक किरण, तरुण उत्साही सेवा मंडळ, मुंबई.

२६ डिसेंबर- सांज सावली. लेखक व दिग्दर्शक: मधुकर पवार, ललित कला भवन, नायगाव.

२७ डिसेंबर- आर्यम. लेखक: गौतम गायकवाड, दिग्दर्शक: संतोष पवार, वावेदिवाळी ग्रामस्थ मंडळ, मुंबई.

२८ डिसेंबर- द रेन इन द डार्क. लेखक: डॉ. सोमनाथ सोनवलकर, दिग्दर्शक: गणेश रेवडेकर, विद्यार्थी उत्कर्ष मंडळ, मुंबई.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्य नाट्यस्पर्धा होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले.

Continue reading

मोदींचा मास्टरस्ट्रोक: 26/11चा मास्टरमाईंड राणाच्या प्रत्यार्पणास ट्रम्पची मंजुरी

26/11च्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड आरोपी असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वुर राणा याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेने मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज, 14 फेब्रुवारीला पहाटे या प्रत्यार्पणास मान्यता दिली. 26/11...

शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या खेळाडूंचे यश

मुंबईतल्या चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्रातील नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत सराव करणाऱ्या अक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स खेळातील 9 खेळाडूंनी देहराडून, उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत 9 सुवर्णपदके पटकावून महाराष्ट्राला पदक तालिकेत द्वितीय क्रमांकावर...

नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारत त्यांच्याजागी हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे आमदार विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेसचे गटनेते म्हणूनही नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ...
Skip to content