Homeचिट चॅटठाण्याच्या श्री मावळी...

ठाण्याच्या श्री मावळी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा १४ एप्रिलपासून

ठाणे येथील श्री मावळी मंडळ संस्थेतर्फे १०१व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७३वी राज्य पातळीवरील पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा मंगळवार, १४-०४-२०२६ ते शनिवार, १८-०४-२०२६ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत एकूण रू. ३,००,०००/- ची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला गटात विजेत्या संघाला ₹ ५१,०००/- , उपविजेत्या संघाला ₹ ३१,०००/- व उपांत्य फेरीतील पराभूत संघाला ₹ ११,०००/- रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पुरुष गटात व महिला गटात उत्कृष्ट खेळाडूस ₹ ५,०००/- , उत्कृष्ट चढाईपटू खेळाडूस ₹ ३,०००/- व उत्कृष्ट पक्कड करणाऱ्या खेळाडूस ₹ ३,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडूस ₹ १,०००/- रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघानी राज्याच्या संकेतस्थळावर (https://player.maharashtrakabaddi.com/Tournament/Default.aspx) प्रवेशअर्ज भरणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर भरलेल्या प्रवेशअर्जाची प्रत संघाची सही व शिक्क्यासह प्रवेश फीसहित श्री मावळी मंडळ कार्यालय (ठाणे) येथे जमा करावी. अन्यथा संघास स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. सदर स्पर्धेसाठी प्रथम प्रवेशअर्ज सादर करणाऱ्या पुरुष गटातील ६४ व महिला गटातील १६ संघांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल क्रमांकावर ९९२०७७६३६१, ९८६७४२१५२४, ८४२२०९८८७८, ९६५३१७५९७० संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

मुंबईत १ एप्रिलपासून चालणार ‘वृक्ष संजीवनी’ अभियान

मुंबई महापालिकेमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘वृक्ष संजीवनी’ अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक वसुंधरा दिन (२२ एप्रिल) निमित्ताने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६, या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात सध्या एकूण २९...

बोटाच्या हलक्याशा हालचालीने झाले उपचार व चालायला लागला रुग्ण!

बीड जिल्ह्यातील राजीव वरवडे यांच्यासाठी एका भीषण अपघातानंतर जीवन जणू थांबलं होतं. मानेच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला अर्धांगवायू झाला होता. मात्र, मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे करण्यात आलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या स्पाइन सर्जरीमुळे त्यांना नवजीवन मिळालं असून,...

फुकेतमधले ‘दगडूशेट गणपती’ मंदिर ठरतंय पर्यटकांसाठी आकर्षण!

हिंद महासागराच्या निळ्याशार किनाऱ्यांनी नटलेले, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले थायलंडमधील फुकेत हे जगातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. प्राचीन काळापासून व्यापार, समुद्री संपर्क आणि विविध संस्कृतींच्या संगमामुळे फुकेतने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बौद्ध...
Skip to content