बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल ‘चिऊ ताई चिऊ ताई दार उघड’, हा टास्क सुरू झाला, ज्यात पुरुष मंडळी महिला सदस्यांना विनवणी करताना दिसून आले. यातून दोन नावं समोर आली, विकास आणि उत्कर्ष. या दोघांमध्ये लढत झाली आणि पहिल्या साप्ताहिक कार्याचा विजेता ठरला उत्कर्ष.

मीराचा घरातल्या सदस्यांबरोबर वेगवेगळ्या मुद्यांवर वाद झाला. तिचा राग सगळ्याच घरच्यांनी अनुभवला. आज शिवलीला घरामध्ये थोडीशी भावूक होताना दिसणार आहे. तिचे म्हणणे पडले, “आईला बघताना कसे वाटत असेल, कसं वागावं कळतं नाहीये”.

त्यावर मीनलने तिला समजावले “तू खूप छान वागतेस. चांगलं खेळतेस. तुझी मतं क्लिअर आहेत. तुला कधीही काही वाटलं तर मी आहे तुझ्यासोबत..
विशाल निकमही म्हणाला “माऊली तुम्ही खूप खंबीर आहात”.

बघूया आज साप्ताहिक कार्यात कोण बाजी मारतं ते. कोणाच्या हाती हार येते? घरामध्ये वेगवेगळे ग्रुप्स होतानाही दिसत आहेत. नक्की कोण कोणासोबत आहे? कोणाची साथ कोणाला मिळणार? हे कळेलच…

काल उत्कर्ष, तृप्ती देसाई यांना सांगताना दिसला, “जर मी हा गेम जिंकलो तर मी तुमच्या लोकांना मदत करणार, जे माझ्या जवळचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथे जी मुलं आहेत ती वेगळ्या टीममध्ये आहेत. जर मी जिंकलो तर पुढच्या टास्कला मी तुमच्या लोकांना म्हणजेच तुम्ही, शिवलीला.. तुम्हाला माहिती आहे कोण कोण ते.. त्यांना मी साथ देईन.. तुम्ही तुमचापण विचार केला पाहिजे. जर टिकायचे असेल तर, विचार करा”..

उत्कर्षने गायत्रीशी बोलताना सांगितले की, “आपल्या टीममधून माझ्याकडे एक पॉईंट आलेला आहे आणि जर मला अजून एक पॉईंट मिळाला तर मी आपल्या टीमला स्ट्राँग करू शकतो”.

तुम्ही दोघीच आहात.. गायत्रीचं म्हणणं पडलं. या राऊंडला तुझं नावं कोणीच घेणार नाही. पण पुढच्या राऊंडला नक्कीच आहे. नक्की कोण या रेसमध्ये टिकून रहाणार? कोण कोणाला टिकवून ठेवणार? कोण बाजी पलटणार? हे कळणार आजच्या भागामध्ये. कारण स्पष्टच आहे. प्रत्येक सदस्य त्याच्या ग्रुपमधल्या सदस्याला वा स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात आहे.

दुसरीकडे, मीनल, विशाल, विकास, सोनाली यांना समजविण्याचा प्रयत्न करते.. नक्की काय गेम झाला? “बझर झाल्यानंतर जय आणि विकास आले. त्यांनी मुद्दा सांगितला आणि निघाले.. कारण, दुसर्याला चान्स मिळायला पाहिजे. पण जेव्हा आविष्कार आणि उत्कर्ष आले तेव्हा त्यांनी खूप वेळ घेतला.

मीनल, विशाल सांगणार आहे.. तू, दादूस आणि अक्षयला सांग.. तुम्ही बाहेर येऊच नका, जोवर बझर होत नाही. जर अक्षय आणि दादूस अडून राहिले, आम्ही बाहेरच नाही येणार म्हणत.. तर खरी गंमत येईल”.
या सर्व गमतीजमती तुम्हाला पाहायला मिळतील आज रात्री बिग बॉस मराठीमध्ये..

