Homeमुंबई स्पेशलमुंबईत आरटीईंतर्गत प्रवेश...

मुंबईत आरटीईंतर्गत प्रवेश घ्या २५ मार्चपर्यंत!

शैक्षणिक हक्क कायद्यानुसार अर्थात ‘आरटीई’नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदादेखील सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने बालकांना प्रवेश घेण्‍यासाठी १७ मार्च २०२३पर्यंत अंतिम मुदत देण्‍यात आली होती. तथापि, पालकांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्‍या निर्देशांनुसार ही मुदत दि. २५ मार्च २०२३पर्यंत वाढविण्‍यात आली आहे.

याबाबतची अर्ज प्रक्रिया व संबंधित माहिती https://student.maharashtra.gov.in किंवा http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजू तडवी यांनी कळविली आहे.

बृहन्‍मुंबई महापालिका – शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष २०२३–२४करिता बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्‍पसंख्‍यांक शाळा वगळून) प्रवेशाच्‍या सुरुवातीच्‍या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्‍या २५ टक्के जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रि‍येच्‍या प्रणालीद्वारे भरण्‍यासाठी दि. १ मार्च ते १७ मार्च २०२३पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, पालकांच्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता दि. २५ मार्च २०२३पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, दि. २५ मार्च २०२३नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असेही शिक्षणाधिकारी तडवी यांनी कळविले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content