मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे शनिवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता छोट्या गटासाठी तबलावादन स्पर्धा आयोजित केली आहे (छोटा गट १० ते १५ वर्षे) तसेच रविवार दि. २७ ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता मोठ्या गटासाठी तबलावादन स्पर्धाआयोजित करण्यात आली आहे (मोठा गट १६ ते २५ वर्षे). या स्पर्धा संस्थेच्या सभागृहात होतील.
या स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहेत. प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२३ असेल. प्रवेशअर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुकवर तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा- ०२२ २४३०४१५०

