मध्य प्रदेश शासनाचा “अखिल भारतीय भा. रा. तांबे कृती पुरस्कार” विख्यात रंगकर्मी योगेश सोमण यांच्या “सुपारी.com” या दोन अंकी नाटकाला जाहीर झाला आहे.
मध्य प्रदेश शासनाच्या संस्कृती विभागाच्या “मराठी साहित्य अकादमी”च्या विद्यमाने प्रतिवर्षी दोन मराठी साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. वर्ष २०२०साठी योगेश सोमण यांच्या “सुपारी.com” या नाट्यलेखनाला आणि सुचेता घोरपडे यांच्या “खुरपं” या कादंबरीला “भा. रा. तांबे कृती पुरस्कार” बुधवारी घोषित झाला आहे.
रुपये ५१,०००/-, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. “मराठी गौरव दिवसा”निमित्त येत्या फेब्रुवारीत भोपाळ इथं होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पुरस्काराचं वितरण होणार आहे.

