श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५च्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यजमान श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंनी शानदार यश संपादन केले. त्यांच्या पेहेलवानांनी एकूण २७ पदके मिळवली. त्यामध्ये १५ सुवर्ण, ८ रौप्य, ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पदकविजेत्या कुस्तीपटूंना वस्ताद वसंतराव पाटील, वैभव माने, कोमल देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळवलेले १५ पेहेलवान विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी दिपाली जोशी, मिरा भाईंदर क्रीडा विभाग समन्वयक जेरविन अल्मेडिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलराज बागल यांनी केले.
स्पर्धेतील पदक विजेते-
सुवर्ण- प्रतिक बोबडे, शिवांश जालुई, दक्ष चौधरी, प्रिया गुप्ता, तनुजा मांढरे, लकी अडबल्ले, ओम जाधव, कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया गुप्ता, मनस्वी राऊत, आदर्श शिंदे, कोमल पटे, डॉली गुप्ता.
रौप्य- साईनाथ गायकवाड, शिवम गिरी, युवराज माली, पृथ्वीराज बोबडे, अमर खंडारे, विकी बॉइनवाड, साई गवळी.
कांस्य- आदर्श काटकर, महावीर गुप्ता, बालाजी पवार, महेश ढगे.