Homeएनसर्कलसंशोधन सहयोगांतर्गत प्रस्ताव...

संशोधन सहयोगांतर्गत प्रस्ताव पाठवा 5 जानेवारीपर्यंत! 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंत्रालयाच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनसोबतच्या संशोधन सहकार्यासंदर्भात प्रस्तावासाठी पहिल्यांदाच संयुक्त आवाहन केले आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि एनएसएफ यांच्यात संशोधन सहकार्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेसंदर्भात मे 2023 मध्ये करार करण्यात आला. हा सहकार्य संशोधन करार विशेषतः परस्पर हिताचे शोध आणि नवोन्मेष यावर भर देतो. प्रस्ताव पाठवण्याची सुरुवात 21 ऑगस्ट 2023पासून सुरू झाली असून प्रस्ताव पाठवण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2024 आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2023 मध्ये केलेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारत-अमेरिका संयुक्त निवेदनात हा करार अधोरेखित करण्यात आला होता.

ह्या पहिल्या संयुक्त आवाहनात, सेमीकंडक्टर संशोधन, नेक्स्ट जनरेशन (अत्याधुनिक) संपर्क विषयक तंत्रज्ञान/नेटवर्क/ प्रणाली, सायबर सुरक्षा, शाश्वतता आणि हरित तंत्रज्ञान आणि इंटेलिजन्ट वाहतूक व्यवस्था या क्षेत्रांशी संबंधित प्रस्ताव विचारार्थ घेतले जातील.

तंत्रज्ञानाचा विकास या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रोटोटाइपचा विकास, प्रायोगिक स्तरावरील प्रात्यक्षिके, फील्ड वरील कामे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाची गती वाढवणे ही कामे केली जातील. अमेरिका आणि भारताच्या संशोधकांच्या प्रस्तावित चमूना त्यांच्या प्रकल्पांच्या यशासाठी संसाधने आणि कौशल्ये उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी तंत्रज्ञान चाचणी प्रदाते, स्थानिक समुदाय आणि उद्योग भागीदारांसह योग्य भागीदारी विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव अलकेश कुमार शर्मा आणि एनएसएफचे संचालक डॉ. पंचनाथन, यांनी आज संयुक्तपणे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव भुवनेश कुमार आणि अमेरिकन दूतावासाचे इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content