Homeटॉप स्टोरीशिवजयंतीवरील निर्बंधांविरूद्ध उसळतोय...

शिवजयंतीवरील निर्बंधांविरूद्ध उसळतोय जनक्षोभ!

सरकारमधल्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांवर कोणतेही निर्बंध न टाकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवावर निर्बंध टाकण्याच्या राज्यातल्या ठाकरे सरकारच्या निर्णयाविरूद्ध राज्यभर तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

१९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला व त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजतादेखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्याठिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने दिले आहेत.

नाना पटोलेंच्या उपस्थितीत शेकडो लोक

एकीकडे राज्य सरकारने हे आदेश जारी केले असतानाच मुंबईत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा कार्यभार राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घेतला. यावेळी पटोले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. टिळक भवनात झालेल्या या कार्यक्रमाला साधारण ७०० ते ८०० कार्यकर्ते गोळा करण्यात आले होते. यावेळी मास्क लावणे, सोशल डिस्टसिंग पाळणे, यापैकी कशाचाही पत्ता नव्हता. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शद पवार यांनी नाशिकला भेट दिली होती. तेव्हाही कार्यकर्त्यांनी अशीच गर्दी केली होती. सरकारला ही गर्दी चालते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम चालत नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.

देवेंद्र फडणीस यांचीही टीका

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. या सरकारमध्ये निर्णय कोण घेते हेच कळत नाही. एक जण निर्णय घेतो. दुसरा बदलतो. मोठमोठ्या कार्यक्रमांना सरकार परवानगी देते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला परवानगी दिली जात नाही. प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणाला निर्बंध लागत नाहीत. मात्र, शिवजंयतीवर निर्बंध लादले जातात, असे ते म्हणाले.

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content