Homeडेली पल्सफडणवीसांच्या उपस्थितीत आजपासून...

फडणवीसांच्या उपस्थितीत आजपासून मॉरिशसमध्येही ‘जय शिवराय..’!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन दिवसांच्या मॉरिशस दौर्‍यासाठी आज सकाळी मॉरिशस येथे आगमन झाले. या दौर्‍यात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार असून, या कार्यक्रमाला मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची उपस्थिती असणार आहे.

मॉरिशसमध्ये आज, 28 एप्रिलला मॉरिशस इंडिया बिझनेस समुदायाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या मॉरिशसमधील विविध कंपन्यांशी भेटी होतील आणि येथेच काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणार आहेत. यात पर्यटन क्षेत्रातील करार प्रामुख्याने असणार आहेत. मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपून यांची सदिच्छा भेटही देवेंद्र फडणवीस घेतील. मॉरिशसचे परराष्ट्र मंत्री गानू यावेळी त्यांच्यासोबत असतील. त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांची ते सदिच्छा भेट घेतील.

सायंकाळी 7.30 वाजता येथील मराठी समुदायाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे शिष्टमंडळ सहभागी होईल आणि त्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण होईल. उद्या, दुसर्‍या दिवशी त्यांचा मराठी समुदायांशी भेटी असा कार्यक्रम आहे. त्यानंतर फडणवीस मायदेशी परततील.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content