पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये दुपारी सुमारे 4:30 वाजता, आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघातील खेळाडूंशी संवाद साधतील आणि त्यांना संबोधित करतील.

हा कार्यक्रम म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचे अभिनंदन करण्याचा आणि त्यांना भविष्यातील स्पर्धांसाठी प्रेरित करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत 28 सुवर्ण पदकांसह एकूण 107 पदके जिंकली. जिंकलेली एकूण पदके विचारात घेतल्यास भारताची आशियाई खेळांमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

या कार्यक्रमाला आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातील खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी, राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे प्रतिनिधी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
