Homeकल्चर +दक्षिण मुंबईला मिळाले...

दक्षिण मुंबईला मिळाले तब्बल ७५० आसनी नवे नाट्यगृह!

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनीव्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयीसुविधा आणि अत्यंत कल्पकतेने उभारलेली देखणी वास्तू यामुळे हे नाट्यगृह नाट्यरसिकांना आणि कलाकारांनाही निश्चितपणे आवडेल, असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी व्यक्त केला.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

भायखळा पूर्व रेल्वेस्टेशनपासून जवळ असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयाजवळील ई‌. एस. पाटणवाला मार्गावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची देखणी वास्तू नुकतीच मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. नाट्यरसिकांसाठी तब्बल ७५० आसनांची व्यवस्था असणाऱ्या या भव्य वास्तूमध्ये ‘चारचौघी’, या मराठी नाटकाचा प्रयोग गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे या एक रसिक प्रेक्षक म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकही या नाट्यप्रयोगाला उपस्थित होते.

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित आणि प्रशांत दळवी लिखित ‘चारचौघी’ या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे आणि पार्थ केतकर या मान्यवर कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. या कलाकारांना आश्विनी भिडे, स्वतः प्रेक्षक म्हणून उपस्थित आहेत, असे कळल्यानंतर त्यांनी नाट्यप्रयोगाच्या अखेरीस अतिरिक्त आयुक्तांना रंगमंचावर बोलवून व पुष्पगुच्छ देत आभार मानले.

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content