Homeबॅक पेजदिल्लीत मेट्रो स्थानकांपासून...

दिल्लीत मेट्रो स्थानकांपासून प्रधानमंत्री संग्रहालयापर्यंत शटल बस सेवा!

प्रधानमंत्री संग्रहालय अभ्यागतांच्या सोयीसाठी विविध पर्यायांचा निरंतर धांडोळा घेत आहे. अभ्यागतांना मेट्रो स्थानके आणि तीन मूर्ती येथे असलेल्या संग्रहालयादरम्यान कनेक्टिव्हिटीच्या समस्या येत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिवहन विभागाच्या व्यवस्थापनाच्या विनंतीवरून, राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारने केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन जवळील मेट्रो स्थानक ते प्रधानमंत्री संग्रहालय यांना जोडणाऱ्या परिघात समर्पित बस सेवा चालवण्यास सहमती दर्शवली आहे. याला मिळणारा प्रतिसाद पाहून लवकरच लोककल्याण मार्गावरील मेट्रोही जोडली जाईल.

अशा प्रकारे या शटल बस सेवेद्वारे संग्रहालयाला भेट देणारे अभ्यागत आपापल्या ठिकाणाहून ये-जा करू शकतात. तिकीट असलेली ही बस सेवा प्रधानमंत्री संग्रहालय येथून तासागणिक असेल. बसमध्ये चढताना संग्रहालयाचे तिकीट उपलब्ध करून देता येईल का, याचीही चाचपणी केली जात आहे. 1 नोव्हेंबर 2023 पासून बससेवा सुरू झाली आहे.

14 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले हे संग्रहालय लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ संशोधक आणि देशी तसेच परदेशी पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. संग्रहालयाला दररोज सुमारे 2000 अभ्यागत भेट देतात. उदघाटन झाल्यापासून या संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या लवकरच 7 लाख होईल.

प्रधानमंत्री संग्रहालयात एक लोकप्रिय लाईट अँड साउंड शोदेखील आहे जो भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या अंतराळ कार्यक्रमाचा उल्लेखनीय प्रवास उलगडतो. यात चांद्रयानच्या यशाचा समावेशही आहे. भारतातील महिला वॉरियर्स (वीरांगना) वर दुसरा लाईट अँड साउंड शोदेखील नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content