Friday, July 12, 2024
Homeबॅक पेजदृष्टीदोष असलेल्‍या ग्राहकांसाठीही...

दृष्टीदोष असलेल्‍या ग्राहकांसाठीही शॉपिंगची संधी

द बॉडी शॉप, या आंतरराष्‍ट्रीय एथिकल ब्‍युटी ब्रँडने आता मुंबईतील पॅलेडियम मॉलमधील आपल्‍या अॅक्टिव्‍हीस्‍ट वर्कशॉप स्‍टोअरमध्‍ये दृष्टीदोष असलेल्‍या ग्राहकांना सर्वोत्तम शॉपिंगचा अनुभव देण्यासाठी ब्रेल वैशिष्‍ट्ये सादर करत भारतात आपला १८वा वर्धापनदिन साजरा केला आहे. द बॉडी शॉपचा हा नाविन्‍यपूर्ण पुढाकार देशभरातील त्‍यांच्‍या स्‍टोअर्समध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने घेतलेल्‍या दृष्टिकोनाचा भाग असेल, जो ब्रँडच्‍या सर्वसमावेशकतेसाठी सुरू असलेल्‍या प्रयत्‍नांमधील मोठा टप्‍पा आहे.

डिसॅबिलिटी राइट्स अॅक्टिव्‍हीस्‍ट व युथ कलेक्टिव्‍ह कौन्सिल (वायसीसी) सदस्‍य विराली मोदी यांच्‍या सल्‍ल्‍यामधून प्रेरित ब्रेल वैशिष्‍ट्यांमध्‍ये स्‍टोअरमधील कॅटेगरी कॉलआऊट्सचा समावेश आहे, ज्‍यामधून सर्वांगीण सर्वसमावेशक शॉपिंगचा अनुभव मिळतो. द बॉडी शॉपच्‍या व्‍यवसाय धोरणांमध्‍ये भारतातील उदयोन्‍मुख चेंजमेकर्सच्‍या मतांना समाविष्‍ट करण्‍यासाठी ऑगस्‍ट २०२३मध्‍ये वायसीसीची स्‍थापना करण्‍यात आली. त्याद्वारे अधिक युवाकेंद्रित, शाश्वत व सर्वसमावेशक दृष्टिकोनाला चालना दिली जात आहे. हा नवीन उपक्रम कंपनीची जेण्‍डर-न्‍यूट्रल उत्‍पादनश्रेणी आणि वैविध्‍यपूर्ण कर्मचारीवर्गापलीकडे द बॉडी शॉपच्‍या सर्वसमावेशकतेचा विस्‍तार करतो.

द बॉडी शॉप – दक्षिण आशियाच्‍या मुख्‍य ब्रँड अधिकारी हरमीत सिंग म्‍हणाल्‍या की, आम्‍हाला मुंबईतील आमच्‍या अॅक्टिव्‍हीस्‍ट वर्कशॉप स्‍टोअरमध्‍ये ब्रेलचा समावेश करण्‍याची घोषणा करताना आनंद होत आहे

आणि ही घोषणा भारतातील आमच्‍या १८व्‍या वर्धापनदिन साजरीकरणाशी संलग्‍न आहे. सर्वसमोवशक नियुक्‍तीपासून ब्रेलच्‍या समावेशापर्यंत आम्‍ही एथिकल ब्‍युटी उपलब्‍ध करून देत आहोत. आमचा सर्वांसाठी सर्वसमावेशक इनस्‍टोअर अनुभवांची खात्री घेण्‍याचा मानस आहे.

कंपनीमध्‍ये या वर्षाच्‍या सुरूवातीला द बॉडी शॉपची मूल्‍ययंत्रणा आणि वायसीसीच्‍या मार्गदर्शनपर धोरणाची चर्चा करण्‍यात आली. हे पाहता ब्रँड एलजीबीटीक्‍यूए+ समुदायासाठी कार्यकर्ता अंकिता मेहरा यांनी दिलेल्‍या सल्‍ल्‍याच्‍या आधारावर लैंगिक सर्वसमावेशकतेला प्राधान्‍य देत आहे. हे प्रयत्‍न नियुक्‍ती, प्रशिक्षण व व्‍यवस्‍थापनाप्रती ब्रँडच्‍या लैंगिकसंवेदनशील दृष्टिकोनामधून दिसून येतात. त्यामधून मुख्‍यालय व स्‍टोअर कर्मचारीदेखील या तत्त्वांचे पालन करत असल्‍याची खात्री मिळते.

चेंजमेकर असण्‍यासोबत ब्‍युटी उद्योगामधील अग्रणी ब्रँडचे १० कर्मचारी सदस्‍य आहेत, जे एलजीबीटीक्‍यूए+ स्‍पेक्‍ट्रमचा भाग आहेत आणि सर्व स्‍तरांवर लैंगिक संवेदनशीलतेचे पालन करतात. तसेच, द बॉडी शॉपने आपल्‍या सर्व कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच सर्वोत्तम डायव्‍हर्सिटी अँड इन्‍क्‍लुजन वर्कशॉपचे आयोजन केले. या वर्कशॉपच्‍या माध्‍यमातून ब्रँडने आपल्‍या कर्मचारीवर्गाला सर्वसमावेशक असणे किती महत्त्वपूर्ण आहे हे जाणून व समजून घेण्‍यास सक्षम केले. तसेच त्‍यांना सर्वांसाठी सुरक्षित, स्‍वागतार्ह व सर्वसमावेशक असलेली स्‍पेस निर्माण करण्‍यास प्रेरित केले, ज्‍यामुळे समान वर्कप्‍लेस निर्माण होईल. 

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!