Homeटॉप स्टोरी‘जनाब सेना’ नाही,...

‘जनाब सेना’ नाही, हे सांगण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा!

मराठी माणसांसाठी, ज्वलंत हिंदुत्वासाठी ओळखली जाणारी शिवसेना, आज आमची ‘जनाब सेना’ झाली नाही हे सांगण्यासाठी आटापिटा करत आहे. याचसाठी शिवसेनेने येत्या २२ ते २५ मार्च, या काळात विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आज, रविवारी दुपारी शिवसेना भवनात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तसेच खासदारांची ऑनलाईन बैठक घेतली. कोरोना, वादळे, अवकाळी पाऊस, पूर अशा विविध नैसर्गीक संकटांच्या धावपळीत आपल्याला भेटायला उशीर झाला. पण, आता आपण जोमाने उतरत आहोत. सध्या आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. विरोधक काय काय करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार. पण, आपणही तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिले पाहिजे. एमआयएमचा कट उधळून लावला पाहिजे. शिवसेनचं हिंदुत्व राज्यभर पोहोचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विरोधकांची हवा पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. विरोधकांचे डावपेच लोकांच्याही लक्षात येत आहेत. उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे आकडे आधीपेक्षा कमी झाले आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्या १२ आमदारांच्या फाईलवर राज्यपालांकडून अद्याप निर्णय झालेला नाही. हे लोकशाहीला न पटणारे आहे. आता आपण घराघरात जाणार आहोत, आपली कामे लोकांना सांगा, आपण घेतलेले निर्णय घराघरात पोहोचवा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

जनाब

येत्या २२ मार्चपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. शिवसेनेने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसेनेचे खासदार हे अभियान चालवतील. एका खासदाराच्या मदतीला १२ पदाधिकाऱ्यांची फळी असणार आहे. शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च, या काळात होणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हा तर भाजपाचा कट

दरम्यान, या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, एमआयएमने महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी दिलेली ऑफर हा भाजपाचा कट आहे. शिवसेनेच्या बदनामीसाठी हा कट रचला गेला आहे. शिवसेनेला ‘जनाब सेना’ असे संबोधणाऱ्यांनी (भाजपाच्या नेत्यांनी नुकतीच शिवसेनेची ‘जनाब सेना’ अशी संभावना केली होती.) आपला इतिहास तपासून घ्यावा. शिवसेनेचे हिंदुत्व बदनाम करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही. शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितल्याचेही राऊत म्हणाले.

भाजपाने इतिहास विसरू नये

शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणून संबोधणाऱ्या भाजपाने आपला इतिहास विसरू नये. काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी हातमिळवणी करून सरकार स्थापन करणारी भाजपा आहे. मेहबूबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केले? हे फुटीरतावादी, दहशतवाद्यांसोबत स्थापन केलेले सरकार असल्याची टीकाही आम्ही त्यावेळी केली होती, असेही ते म्हणाले. एमआयएम भाजपाची बी टीम आहे. त्यामुळे एमआयएमसोबत युती होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content