Homeचिट चॅटबिग बॉसमध्ये आज...

बिग बॉसमध्ये आज बघा जयची वेगळी बाजू!

अद्भुत नगरात बर्‍याच अद्भुत घटना बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर अद्भुत नगरात केल्यानंतर बिग बॉसने सदस्यांना साप्ताहिक कार्यादरम्यान टास्क दिले आहेत. या टास्कदरम्यान प्रत्येक सदस्याची एक वेगळीच बाजू बघायला मिळत आहेत. काल जयने स्नेहाला दिलेले कार्य असो, विशालने उत्कर्षला दिलेले कार्य असो वा मीराने मीनलला टक्कल करायला सांगणे असो. अनेक विविध टास्क दिले गेले. बहुतांशी टास्क पूर्ण करण्याचा देवदूत झालेल्या सदस्यांनीही प्रयत्न केला.

राक्षस बनलेल्या टीमचा विशाल संचालक असून त्याने टास्कदरम्यान घेतलेले निर्णय विकास आणि इतर सदस्यांना पटले नाहीत असे दिसून येत आहे. विशालने विकासला टास्कमधून बाद केल्यानंतर विशाल आणि विकास यांच्यामध्ये मोठा राडा झाला. ज्यामध्ये हे दोघे एकेमेकांना बरंच काही बोलूनदेखील गेले. विशाल हे टास्कमध्ये असे का वागतो? नक्की काय झालं? कळेल आजच्या भागामध्ये.

दादूसलाही टास्कमधून बाद केल्यानंतर विकासने त्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर विशालने दादूसचे नाव त्याची कारणं सांगत मिटवले. विशालचे म्हणणे आहे- मी संचालक आहे. त्यामुळे मला सांगू नका. याचवरुन आज जय आणि विशालमध्ये खूप मोठा राडा होणार आहे. जयने विशालला काल पटवण्याचा प्रयत्नही केला. बघूया आज पुढे होते… कुठेतरी घर VS विशाल असे चित्र दिसत आहे.

विशालचे म्हणणे आहे, “मी संचालक म्हणून मला जे वाटलं ते मी केलं. माझी मर्जी मी केलं. मीरा म्हणाली योग्य नाहीये हे डिसीजन.. जय म्हणाला, जेवढं तू खेळलास ना तेवढं बाकी सगळे इथे खेळले आहेत, लक्षात ठेव हे… अशी गोष्ट झाली ना की वाईट वाटतं. अभिमान होता तुझ्यावर. आज ते सगळं…….. आपल्या माणसांचा होऊ शकत नाही तो…”

हा वाद कुठवर गेला… विशाल त्याचा मुद्दा सदस्यांना पटवून देऊ शकेल?

बिग बॉसच्या घरामध्ये ग्रुपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसत आहेत. एकमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये. वा कुठतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे… कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढेमागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो वा चर्चा असो, हे चौघंही एकत्रच चर्चा करून काय तो निर्णय घेताना दिसतात. पण असे काही घरात घडले आहे ज्यामुळे गायत्री जरा चिंतेत आहे आणि ती हीच गोष्ट आज मीराला बोलून दाखवणार आहे. मीराचं बोलणं गायत्रीला पटलं असून नक्की असं काय झालं की गायत्रीला असं वाटलं? ते आजच्या भागामध्ये कळेलच.

गायत्री मीराला म्हणाली, मी एक ठरवलं आहे. मी काही कोणाशी बोलायला जाणार नाहीये. फक्त मी बघणार आहे यावेळेस आणि मग त्याप्रमाणे मी पुढे… जर मी राहिले या शनिवारनंतर… तर मग मी त्याप्रमाणे खेळेन. मीरा म्हणाली- ऑफकोर्स तू राहणार आहेस.

गायत्री म्हणाली- काहीही होऊ शकतं. मी उत्कर्षला पण हेच म्हणत होते, की जेव्हा आपण ग्रुप ग्रुप म्हणतो तेव्हा चल माझ्यासाठी एकच माणूस खेळू शकतो तर मग ते तू खेळशील किंवा उत्कर्ष खेळेल. मला कोणीही चालेल तो प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा स्पर्धक असतात चार लोकं, तेव्हा स्पर्धकालाही आपल्याकडून पाठिंबा नाही मिळाला पाहिजे. हीपण आपलीच ड्युटी आहे ना? हा माझा हा मुद्दा आहे.

मीरा म्हणाली, म्हणून मी तुला म्हणाले काही गोष्ट या आपल्यातच राहू दे. कारण काय होणार, उद्या काही झालं ना.. हे दोघं एकमेकांना पाठिंबा देणार, हे स्पष्ट आहे. एकदम जे दिसतं आहे. त्यामुळे याच्यापुढे आपण हे बोलायचे नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचे आहे… प्रत्येकजण इथे सेल्फिश आहे, आपण बोलून घाण नाही व्हायचं.. हे मी इथे शिकले आहे. त्यामुळे मी बोलणं बंद केलं आहे…”

बघूया पुढे अजून कायकाय गोष्टी घडल्या घरामध्ये. आजच्या भागात.. बिग बॉस मराठी.. कलर्स मराठीवर.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content