Homeएनसर्कलVLSRSAMची सलग दुसरी यशस्वी...

VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी यशस्वी

डीआरडीओ आणि भारतीय नौदलाची ओदिशाच्या किनारपट्टीवरून व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, VLSRSAMची सलग दुसरी यशस्वी उड्डाण चाचणी केली.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाने, VLSRSAMच्या एकापाठोपाठ एक यशस्वी उड्डाण चाचण्या केल्या आहेत. सलग दुसरी चाचणी काल, 13 सप्टेंबरला ओदिशातील चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि रडारवर दिसू न येणाऱ्या अतिवेगवान हवाई लक्ष्यावर हल्ला केला आणि  लक्ष्य निष्प्रभ करण्याची अचूकता आणि क्षमतेचे दर्शन घडवले.

त्याआधी 12 सप्टेंबरला पहिली चाचणी घेण्यात आली तेव्हाही VLSRSAM क्षेपणास्त्राने कमी उंचीवरील लक्ष्याचा भेद यशस्वीपणे पूर्ण केला. सलग घेण्यात आलेल्या या चाचण्या केवळ शस्त्रप्रणालीची विश्वासार्हता दर्शवत नाहीत तर प्रणालीतील विविध घटकांमध्ये अलीकडील काळात करण्यात आलेल्या सुधारणादेखील प्रमाणित करतात.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या यशस्वी उड्डाण चाचण्यांसाठी डीआरडीओ, भारतीय नौदल आणि सर्व संबंधित चमूंचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्रामुळे सशस्त्र दलांना  तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखी चालना मिळेल, असे ते म्हणाले. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनीही VLSRSAM प्रणालीच्या उड्डाण चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या चमूचे अभिनंदन केले.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content