Thursday, November 7, 2024
Homeचिट चॅटचंद्रशेखर खैरनार यांना...

चंद्रशेखर खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ पुरस्कार

‘साहित्यसंपदा’, या साहित्यिकांच्या समूहातील संस्थापक वैभव धनावडे यांनी चंद्रशेखर सुरेश खैरनार यांना ‘समाज दीपस्तंभ’ हा पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे. संस्थेच्या आगामी संमेलनात तो त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चंद्रशेखर खैरनार यांनी सेनादलात असताना तीन लढायांमध्ये सहभाग देऊन केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना आठ सेनापदके मिळाली आहेत. गोवा मुक्ती, भारत-चीन युद्ध, बांगलादेश मुक्ती यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक आदिवासी मुलांची आश्रमात काळजी

घेतली. त्यांना अन्न, वस्त्र, ज्ञान कसे मिळेल यासाठी ते झटले. जायंट्स इंटरनॅशनलचे फेडरेशनचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाखा त्यांनी प्रस्थापित केल्या. अनेक शिबिरे भरवून गरजूंसाठी रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, तपासणी, नेत्रदान आदी कार्य केले.

सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी छायाचित्रणासाठी वेळ दिला. धुळे शहरात पहिल्यांदा कलर लॅब सुरु केली. नंतर एल.एल.बी. पदवी प्राप्त करून मुंबईतील मुल्ला अँड मुल्लासारख्या प्रतिष्ठित आस्थापनातून वकिली केली. 

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content