Homeमुंबई स्पेशलमतदानाच्या जनजागृतीसाठी घाटकोपरमध्ये...

मतदानाच्या जनजागृतीसाठी घाटकोपरमध्ये झाली ‘रन फॉर वोट’

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ‘रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मतदारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत चार लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजनाबाबत प्रशिक्षण दिले आहे.

मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघांतर्गत मुंबई उपगनर जिल्ह्यातील १७०-घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील युवकांची मतदानाबाबत जनजागृती करुन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

युवकांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धकांना केले. प्रत्येक मत महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा म्हणजे मतदानाबाबत जनजागृतीचा कार्यक्रम आहे.

या स्पर्धेदरम्यान पोस्टर आणि बॅनरवरील संदेशाद्वारे मतदानाबाबत जागृती करण्यात आली. ही स्पर्धा घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथून सुरु करण्यात आली आणि विक्रोळी येथे ईस्टन एक्सप्रेस हायवेवरील गोदरेज घोडा गेट येथे समाप्त करण्यात आली. यामध्ये मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content