Homeकल्चर +‘अदृश्य’ शोधण्यासाठी रितेश देशमुख, मंजिरी...

‘अदृश्य’ शोधण्यासाठी रितेश देशमुख, मंजिरी फडणीस ओटीटीवर!

प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द ‘अल्ट्रा झकास’ने पाळला आहे. ‘रौद्र’, ‘कुलस्वामिनी’, ‘इरुल-रात्र अंधारी’, ‘बोल हरी बोल’ आणि ‘थरार प्रेमाचा-अथिरन’नंतर ‘अदृश्य’ या मल्टीस्टारर चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा त्याने केली आहे. १५ मेपासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या चित्रपटातील रहस्य्यांचा उलगडा होणार आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री मंजरी फडणीस, हॅण्डसम हंक पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि सुपरस्टार रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अदृश्य’ या रोमांचक रहस्यमय चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा ‘ताल’, ‘परदेस’, ‘कहो ना प्यार है’, ‘वेल कम बॅक’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांनी सांभाळली आहे. प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या सायलीचा मृत्यू होतो. तर, सायलीची जुळी बहिण असणारी सानिका आपल्या बहिणीच्या मृत्यूमागचं गूढ शोधण्यासाठी प्रयत्न करते. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्त्या की आत्महत्त्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देत नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर येतो.

कलाकारांची उत्तम फळी लाभलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

दोन हजार तासांपेक्षा अधिक तासांचा कन्टेंट उपलब्ध असणाऱ्या ‘अल्ट्रा झकास’वर मराठी भाषेत डब केलेले दाक्षिणात्य आणि हॉलीवूडच्या चित्रपटांबरोबरच, जुने आयकॉनीक मराठी चित्रपट आणि विविध विषयांवरील वेब सीरिज, किड्स अॅनिमेश, वेब-शो असा मनोरंजनाचा खजिना उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या.

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content