Homeचिट चॅटयंदाही श्री गणेशोत्सवावर...

यंदाही श्री गणेशोत्सवावर सरकारी निर्बंध!

राज्यातल्या कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने यंदाही श्री गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या धोरणानुसार सार्वजनिक श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त चार फूट तर घरगुती श्री गणेशोत्सवात जास्तीतजास्त दोन फूट असावी, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने राज्य सरकारने आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. स्थानिक प्रशासनाचे मंडपविषयक धोरण कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सुसंगत असावे. गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू वा संगमरवर मूर्तींचा वापर करावा. मूर्ती शाडू वा पर्यावरणपूरक असावी. तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावांत करावे, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

उत्सवाकरीता देणग्या वा वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहवे. आरोग्यविषयक, सामजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. विविध आजारांबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांचे काटेकोर पालन करावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ध्वनीप्रदूषणाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.

श्री गणेशाचे दर्शन ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबुक आदींद्वारे उपलब्ध करून देण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न व्हावा. गणपती मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था व्हावी. दर्शनाला येणाऱ्या भाविकांकडून शारीरिक अंतर पाळले जाईल, याची काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर व्हावा. श्रींच्या आगमन वा विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. लहान मुले, वरिष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. घरगुती गणेशोत्सवाच्या मिरवणुका एकत्रितपणे काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरीता कृत्रिम तलाव उभारावेत, असेही शासनाने जाहीर केले आहे.

Continue reading

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...

हॉलिवूड नगरीत मराठी तारे-तारकांचे जल्लोषात स्वागत!

'नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म असोसिएशन' (नाफा)च्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी अवघे काही तास उरले असून, महाराष्ट्रातून हॉलिवूड नगरीत दाखल झालेल्या निमंत्रित कलाकारांचे सॅन होजे येथे जल्लोषात स्वागत झाले. २४ जुलैच्या रात्री 'नाफा'चे संस्थापक-अध्यक्ष अभिजीत घोलप यांच्या सिलिकॉन व्हॅली येथील...
Skip to content