Homeएनसर्कल‘बिपरजॉय’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडून...

‘बिपरजॉय’च्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडून गुजरातमधील तयारीचा आढावा

अरबी समुद्रात येऊ घातलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली काल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. या बैठकीत त्यांनी  गुजरात सरकार आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) महासंचालकांनी समितीला पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ च्या सद्यस्थितीची माहिती दिली. 14 तारखेच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, नंतर ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 15 जूनच्या दुपारपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छ तसेच जखाऊ बंदर, मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची लगतची पाकिस्तान किनारपट्टी पार करेल. यावेळी या चक्रीवादळाची तीव्रता 125-135 किमी प्रतितास असेल आणि यावेळी 150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) याआधीच 12 तुकड्या तैनात केल्या आहेत आणि 3 अतिरिक्त तुकड्या गुजरातमध्ये सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, 15 तुकड्या, म्हणजे, अरकोनम (तामिळनाडू), मुंडली (ओडिशा) आणि भटिंडा (पंजाब) येथे प्रत्येकी 5 तुकड्यांना तात्काळ हवाई  कारवाईसाठी सतर्क ठेवण्यात आले आहे. जहाजे आणि विमानांसह तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

यावेळी कॅबिनेट सचिव म्हणाले की, समुद्रातील मच्छीमारांना परत बोलावण्यात यावे आणि हे चक्रीवादळ जमिनीवर धडकण्यापूर्वी असुरक्षित भागातील लोकांना वेळेत बाहेर काढले जाईल याची खात्री केली पाहिजे. कॅबिनेट सचिवांनी गुजरात सरकारला आश्वासन दिले की, सर्व केंद्रीय संस्था कारवाईसाठी तयार आहेत आणि मदतीसाठी उपलब्ध असतील.

या बैठकीला गुजरातचे मुख्य सचिव, केंद्रीय गृह सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, ऊर्जा, बंदरे, जहाज आणि जलमार्ग, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव, टेलिकॉम विभागाचे महासंचालक एनडीएमए, सीआयएससी आयडीएसचे सदस्य सचिव, आयएमडी चे महासंचालक एनडीआरएफचे महासंचालक, कोस्ट गार्ड आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content