Homeटॉप स्टोरीकंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक...

कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक फक्त दीड महिन्यांसाठी!

शिक्षक भरतीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून काही काळासाठी स्थगिती दिली गेली होती. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारची भरती आपण सुरू केली. आता ही स्थगिती उठलेली आहे. भरतीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे. त्यामुळे कंत्राटावरील सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा जास्तीतजास्त एक ते दीड महिना चालेल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

राज्यातले शिक्षण आणि शिक्षक या विषयावर सतीश चव्हाण यांनी एक लक्षवेधी सूचना मांडली होती. शिक्षणामध्ये देशात याआधी दुसऱ्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र आता सातव्या क्रमांकावर गेला आहे, असे ते म्हणाले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने आता वर्गीकरणाची पद्धत बदलल्यामुळे महाराष्ट्राचा क्रमांक सातवा लागला आहे. यातील तपशीलवार माहिती अशी आहे की, पहिल्या पाच क्रमांकावर एकही राज्य नाही आणि सहाव्या क्रमांकावर चंदीगड आणि पंजाब या दोघांचा समावेश आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर सर्व राज्ये सातव्या क्रमांकावर आहेत, असे ते म्हणाले.

राज्य सरकार नव्या दमाचे तयार झालेले शिक्षक सोडून सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीवर घेत आहे, याबद्दल सुधाकर अडबाले यांनी सरकारवर टीका केली. त्याला उत्तर देताना केसरकर यांनी शिक्षक भरतीचे वेळापत्रक जाहीर केले. जिल्हा परिषदांकडून 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान रोस्टर व बिंदू नामावली निश्चित करून जाहिराती दिल्या जातील. एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत प्राधान्यक्रम निश्चित केला जाईल. 10 ऑक्टोबरला गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. 11 ते 21 ऑक्टोबरदरम्यान नेमणुका होतील. त्यानंतर 21 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत नव्याने दाखल होणाऱ्या शिक्षकांना शिक्षकांचे कौन्सिलिंग केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content