Homeमुंबई स्पेशलविधानमंडळाचे निवृत्त सचिव...

विधानमंडळाचे निवृत्त सचिव भास्कर शेट्ये यांचे निधन

विधानमंडळाचे निवृत्त सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेट्ये यांचे आज दुपारी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. 

भास्कर शेट्ये यांचे शिक्षण रत्नागिरीत झाले. त्यानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगाव, पालघर, पणजी आदी ठिकाणी त्यांनी न्यायाधीश म्हणून अनेक वर्षे काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेन त्यांची महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव म्हणून निवड झाली. विधानसभा सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.

विधानसभा सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकिंग लोकपाल म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. निवृत्तीनंतर त्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. भास्कर शेट्ये गगनगिरी महाराजांचे निःस्सीम भक्त होते. त्यांना महाराजांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता. निवृत्तीनंतर त्यांनी विविध सामाजिक संस्थांमध्ये काम केले होते. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते. 

न्यायप्रिय व शिस्तप्रिय म्हणून ते प्रसिद्ध होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यांना जवळून सहवास लाभला होता. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाऊंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दलच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शामल, ज्येष्ठ चिरंजीव मुंबई हायकोर्टाचे ऍड. सचिंद्र शेट्ये तसेच धाकटे चिरंजीव तारांगण क्षेत्रात काम करणारे अभिजित शेट्ये, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content