कृष्णजयंतीच्या निमित्ताने कृष्ण सख्या रे – श्रीरंगा रे.. हे गीतकार रेखा नार्वेकर यांनी शब्दबद्ध केलेले गीत उद्या, रविवारी २९ ऑगस्टला विविध सामाजिक माध्यमातून प्रसिद्ध होत आहे.
संगीतकार अभिजित राणे यांचे संगीत लाभलेले हे गीत गायिका माधुरी करमरकर यांच्या आवाजात बझ झन स्टुडिओ – पार्ले, येथे ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. संगीत संयोजक सिद्धांत करावडे आहेत. प्रसिद्ध बासरीवादक विजय तांबे यांनी बासरीवादनाची साथ या कृष्णगीताला केली असून सौरभ काजरेकर यांनी ध्वनिमुद्रणाची बाजू सांभाळली आहे.

